पोलीस स्टेशन कुही यांची कार्यवाही
कुही :- पोलीस स्टेशन कुही येथील स्टाफ पो.स्टे. कुही हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम हे कुही ते मांढळ रोडवर देशी दारूची अवैध वाहतुक करणार आहेत. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून कुही ते मांडळ रोडवर स्मशान भूमीजवळ नाकाबंदी करून एक मोटार सायकल ही संशयितरीत्या कुही कड़े येत असतांना दिसली. त्यावर दोन इसम व काहीतरी संशयास्पद वस्तु दिसुन आल्याने त्या वाहनावर बसलेल्या इसमांवर पोलीसांना संशय आल्याने कुही पोलीसांनी त्या वाहन चालकास हाताचा इशारा करुन रोडचे बाजुला वाहन थांबविण्यास सांगीतले असता सदर वाहन चालकाने त्याचे वाहन हे रोडच्या बाजुला थांबविल्याने सदर वाहन चालक व त्याचे पाठीमागे बसलेल्या इसमास त्यांचे जवळ असलेल्या प्लास्टीक चुंगळी मध्ये असलेल्या वस्तु बाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यामध्ये देशी दारुचे निप असल्याचे सांगीतले यावरून कुही पोलीसांनी पंचासमक्ष चालक व पाठीमागे बसलेला इसम यांना त्यांचे नाव गाव विचारले असता मोटार सायकल चालक याने त्याचे नाव १) चेतन खुशाल सावें, वय ३२ वर्ष, रा. वार्ड नं. १२ कुही जिल्हा नागपुर असे सांगीतले तर त्याचे पाठीमागे प्लास्टीक जोरी घेवुन बसला असलेला इसम याने त्याचे नाव २) हीमांशु प्रेमदास बोरकर, वय २० वर्ष रा. मालची ता. कुही जिल्हा नागपुर असे सांगीतले व गाडीवर असलेल्या मुद्देमाला बाबत विचारपुस करून त्यांना प्लास्टीक चुंगळी पंचासमक्ष उघडायला सांगीतले असता त्यांचेकडे १८० ML देशी दारु भिंगरी संज्ञा नं. ०१ च्या २६४ प्लॅस्टीकच्या निपा प्रत्येकी किमती १००/- रु. प्रमाणे एकुण २६४०० /- रुपये व ९० ML देशी दारु भिंगरी संत्रा नं. ०१ च्या ५०० एलॅस्टीकच्या निपा प्रत्येकी किंमती ५०/- रु. प्रमाणे एकूण २५००० /- रुपये आरोपीस देशी दारु बाळगण्याबाबत परवाना विचारला असता त्यांचे जवळ परवाना नसल्याचे सांगीतले. मोपेड अॅक्टीव्हा क्र. MH४० AF ७२१९८ यांचेवर वाहतुक करतांना मिळुन आल्याने सदरची मोपेड़ अॅक्टीव्हा किंमती अंदाजे ५००००/- रुपये असा एकूण १,०१,४००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यातील आरोपीतांना अटक करण्यात आली आहे पो.स्टे. कुही येथे आरोपीताविरुध्द कलम ६५ (ई), अ. ८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात, परि, सहायक पोलीस अधीक्षक अनिल मस्के (भा.पो.से.), पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, सहायक फौजदार क्रिष्णा पुटके, पोलीस नायक राजेंद्र मारवते, पोलीस अंमलदार पियुष वाडीकर, पोलीस स्टेशन कुही यांनी केली.