– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई
नागपुर :-नागपुर ग्रामिण जिल्हयात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत असल्याने त्यावर आळा घालण्याकरीता पोलीस अधिक्षक विशाल आनंद नागपुर ग्रामिण यांनी दिलेल्या सुचनेवरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण यांनी त्याकरीता विशेष पथक स्थापन केले होते. दिनांक २८/०६/२०२३ रोजी सदर पथकाने गोपनिय माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे भिवापूर येथे पाटील पेट्रोलपंप जवळ एक संशयित इसम फिरत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन आरोपी नामे- १) अक्षय पृथ्वीराज जांबुडकर, वय १९ वर्ष, रा. वार्ड नं. ५ लाखादूर ता. लाखादूर जि. भंडारा याला ताब्यात घेतले. त्याने विचारपुस दरम्यान सदर मोटर सायकल चोरी ही मौजमस्ती करीता पैशांची आवश्यकता असल्याने केल्याचे सांगीतले. त्यांचे ताब्यातून पोलीस ठाणे भिवापूर हद्दीतून चोरी केलेली एक काळया रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मो. सा. क्र. MH ४० AA ८४९६ किंमती अंदाजे १५,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस ठाणे भिवापूर येथील अप. क्र. ३३०/२२ कलम ३७९ भा.द.वि. मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.
नमुद आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील तपासाकरीता पोलीस ठाणे भिवापूर यांचे ताब्यात दिलेले असुन पुढील तपास पोलीस स्टेशन भिवापूर करीत आहेत. सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरिक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी, रोशन काळे, पोलीस नायक विपीन गायधने, प्रमोद भोयर,पोलीस हवालदार अमोल कुधे यांचे पथकाने केली.