– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई
नागपुर :- दिनांक २५/०६/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे कन्हान उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय मुखबिरकडुन माहिती मिळाली की, एक इसम पोलीस स्टेशन कन्हान हद्दीत अवैधरीत्या अग्नीशर बाळगून काहीतरी गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असलेला रामटेक येथे राहणारा आरोपी नामे- राहुल भारत फुलझेले वय २५ वर्ष, रा. रामटेक हा आपले जवळ देशी कट्टा बाळगून अप्रीय घटना करण्याचे उद्देशाने डुंबरी बस स्टॉप येथे बसून आहे अशा मिळालेल्या खबरेवरून आरोपीस पकडले असता त्याला ताब्यात घेऊन पंचा समक्ष त्यांची झडती घेतली असता त्याचे अंगझडतीत एक लोखंडी देशी कट्टा किंमती अंदाजे ३०,०००/- रु. एक जिवंत कारतूस किंमती अंदाजे १०००/- रू. सह मिळुन आला. सदर हत्यारा बाबत आरोपीला परवाना विचारला असता त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे मिळुन आले नाही. आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस ठाणे कन्हान यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस हवालदार, नाना राऊत, ईकबाल शेख, पोलीस नायक बोरू नरड, मोनू शुक्ला, पोलीस शिपाई अभिषेक देखमुख यांचे पथकाने केली.