भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई :- महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येत्या पंधरा दिवसात कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात अर्ज करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

त्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :- अर्जदार संस्था मुंबई उपनगर जिल्हयातील (स्थानिक) तसेच महिला पदाधिकारी असल्यास प्रथम प्राधान्य असेल., संस्था नोंदणी अधिनियम १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे., संस्थेस किमान ३ वर्षांचा महिला समुपदेश क्षेत्रातील अनुभव आवश्यक जास्त अनुभव असल्यास प्राधान्य., समुपदेशनासाठी एमएसडब्ल्यू (MSW) उत्तीर्ण दोन समुपदेशक कर्मचारी यांची यादी व कागदपत्र जोडणे आवश्यक आहे., संस्थेची घटना व नियमावली आवश्यक ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवणे हा उददेश असावा, सनदी लेखापालांची स्वाक्षरी असलेला मागील तीन वर्षांचा अहवाल (ऑडीट रिपोर्ट ), संस्थेचे मागील तीन महिन्यांचे माहिना निहाय बँक स्टेटमेंट जोडावे., संस्थेचे कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यादी जोडावी, संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत तसेच कोणीही सदस्य शांसकीय सेवेत नाहीत याबाबतचे हमीपत्र सोबत जोडावे., संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. आवश्यक, संस्थेच्या पदाधिकारी (अध्यक्ष व सचिव) यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे विना दुराचार प्रमाणपत्र जोडावे., ज्या स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव आवश्यक आहे. (सोबत आवश्यक ती कागदपत्रे पुरावा म्हणून जोडावेत.) असे मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच. नागरगोजे यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निरामय जीवनशैली कार्यपद्धती कार्यशाळा शुक्रवारी, डॉ. हेमंत ओस्तवाल यांचे मार्गदर्शन

Thu Jun 15 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच ताण तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी निरामय जीवनशैली कार्यपद्धतीबद्दल उद्या शुक्रवारी १६ जून रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये सकाळी १० वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत मोटिव्हेशनल स्पीकर, आरोग्य विषयक मार्गदर्शक नाशिक येथील डॉ. हेमंत ओस्तवाल हे मार्गदर्शन करतील. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!