नागपूर :- दिनांक ०९.०६.२०२३ चे १९.०० वा. दरम्यान पोलीस ठाणे कोतवाली प्लॉट न. ५०४, भुतिया दरवाजा, दसरा रोड, तुळशीबाग येथे राहणार्या फिर्यादी हिना शेख सादीक शेख ३० वर्षं यांना घरघुती भांडणाचे कारणावरून आरोपी तिचा दिर नामे सरफराज उर्फ तपी शेख वल्द बबु शेख वय ३४ वर्ष रा. बड़ी मस्जिद जवळ, हसनबाग याने फिर्यादीचे राहते घरी येवुन तिचे सोबत भांडण करून, पांढऱ्या रंगाचे कटरने तिचे गालावर मारून जखमी केले तसेच लाल रंगाचे दुपट्टयाने गळा आवळुन तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जख्मी फिर्यादी हिला उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आलेले आहे. उपचार सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कोतवाली येथे पोतपनि सोनपरा ९२३४२९३४० यांनी आरोपांविरुध्द कलम ३०७ ४५२ भादवि. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी यास अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.