संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नयानगर कामठी येथून प्रशांत यादव यांची चारचाकी कार अज्ञात चोरट्याने चोरी करून पळ काढल्याची घटना 19 मे ला रात्री दरम्यान घडली होती.यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली असता शोध दरम्यान चोरट्याचा शोध लावण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असून या कारवाहितुन चोरीस गेलेली मारुती सुजूकी कार क्र एम एच 40 सी एच 4554 शिवणी येथून हस्तगत करीत तीन चोरट्याना अटक करण्यात आले .
ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त,एसीपी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोरे, डी बी स्कॉड चे अनिल बडराजे, वेदप्रकाश यादव, सुधीर कनोजिया, आशिष भुरकुंडे, राहुल वाघमारे, श्याम गोरले, नसीम, राजेश, भुपेंद्र आदींनी केली .