‘आपल्या घरावर तिरंगा कसा लावावा’ याबाबत ध्वज संहिता नागरिकांनी ध्वज संहितेचे पालन करावे – जिल्हाधिकारी

नागपूर  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर झेंडा उपक्रम जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत नागरिक घरी झेंडा फडकविणार आहेत. राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये. यासाठी आपल्या घरावर तिरंगा कसा लावावा, याबाबत ध्वज संहिते माहिती दिली आहे. या ध्वजसंहितेचे सर्व नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
ध्वजसंहितेनुसारआपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला असावा, सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरी पासून तयार केलेला तिरंगा चालेल. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवन 3:2 या प्रमाणात ठेवावी. ध्वज फडकवितांना हवामान कसेही असले तरी तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावा. म्हणजेच दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तीनही दिवशी रोज सकाळी फडकवावा आणि सूर्यास्ता वेळी रोज उतरावा. घरी लावलेल्या झेंड्याबाबतही हे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज उतरवल्यानंतर व्यवस्थित आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील याची काळजी घ्यावी. यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अवमान समजण्यात येतो. राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. त्याला स्तंभाच्या मध्ये अगर खाली किंवा इतरत्र लावू नये.राष्ट्रध्वज लावताना,इतर सजावटी वस्तू लावू नये, केवळ फडकवण्याआधी त्यात फुलं किंवा पाकळ्या ठेवण्यास मनाई नाही, तसेच राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण सावधानतेने आणि सन्मानाने हळूहळू उतरवावा. ध्वजावर कोणते प्रकारचे अक्षर चिन्ह लावू नये. तसेच ध्वज स्तंभाच्यावर अथवा आजूबाजूला काही लावू नये, ध्वज जमिनीपासून उंचावर लावावा. ध्वज जाणून-बुजून जमिनीवर अगर पाण्यामध्ये बुडणार नाही अशा पद्धतीने लावावा. राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायाकरिता करता येत नाही. तसेच त्याची अवहेलनाही करणं दंडणीय अपराध आहे. त्यामुळे ध्वजाचा उपयोग गाडीवर झाकणे, इमारतीवर झाकणे, टेबलवर टेबल क्लॉथ प्रमाणे टाकणे, ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करणे येणार ध्वजाचा रुमाल, उशी कींवा शर्ट आदींवर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम किंवा छपाई करणे चुकीचे आहे. राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये. तसेच तो एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये. ज्या स्तंभावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे, त्या काठीवर वा स्तंभावर ध्वजाच्या टोकावर फुले किंवा हार यासारखी कोणतीही वस्तू, बोधचिन्ह ठेवू नये. राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. राष्ट्रीय ध्वज उभारताना तो कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आहे. आपली अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल अशा प्रकारे कृत्य करू नये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या घराघरात हा ध्वज लावायचा आहे. त्यामुळे ही ध्वज संहिता पाळण्यात यावी,असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भूजल योजनेचे कलापथक कार्यक्रमाचे सादरीकरण

Sat Jul 23 , 2022
नागपूर : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA) कार्यालयाकडून अटल भूजल योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील काटोल मधील 108 व नरखेड मधिल 14 असे एकूण 122गावांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विविध विभागाच्या सहकार्याने जलसंधारणाच्या उपाय योजना राबविण्यात येत असून लोकसहभागाद्वारे समाजाच्या पाणी बचतीच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी देखिल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा काम करत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com