– मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
वाडी (प्र):- वाडी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाडी नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनातील प्रलंबित असलेल्या मागण्या विषयी निदर्शने व आंदोलन मोर्चा काढण्यात आला होता. मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटोल बायपास चौकातील मनसे कार्यालयापासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. नारेबाजी करत मनसे कार्यकर्ते पदाधिकारी वाडी नगरपरिषदेपर्यंत पोहोचले. मोर्चात उपस्थित असलेल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांपैकी केवळ 6 कार्यकर्तांना वाडी नगरपरिषद कार्यालयात येण्यास परवांगी देण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उर्वरित मोर्चातील उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेरच थांबवण्यात आले. वाडी नगरपरिषद कार्यालयात जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर,उपाध्यक्ष सचिन चिटकुले यांच्यासह तालुका अध्यक्ष दिपक ठाकरे,जयंत चव्हाण इ. पदाधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकारी रत्नमाला फटींग यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सोपवून प्रलंबित मागण्यावर चर्चा केली.निवेदन देण्यासोबतच मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला. निवेदन देताना मनसेने वाडी शहरात शासकीय रुग्णालय उभारण्याची,शहरात घरे बांधण्यासाठी आरएल परवानगी देण्याची,उद्यानाचे बांधकाम व अवैध अतिक्रमणे हटविण्याकडे लक्ष वेधण्याची, जनतेला 24 तास शुद्ध पाणी, शहरात ठिकठिकाणी पथदिवे बसवावेत इ. मागण्या करण्यात आल्या.तसेच इतर विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या सर्व प्रश्नांकडे लक्ष देऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मनसे पदाधिकाऱ्यांपेक्षा पोलिस बंदोबस्त अधिक मजबूत असल्याचे दिसून आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर जिल्हाअध्यक्ष आदित्य दुरुगकर,उपाध्यक्ष सचिन चिटकुले, तालुका अध्यक्ष दिपक ठाकरे,जयंत चव्हाण, स्वप्निल चौधरी, राकेश चौधरी, धनराज गिरीपुंजे, प्रीतम कांपल्लिवार, सूरज भलावी,विठोबा घुरडे,अमित निंबोळकर,मुकेश मुंडेले,अजिंक्य वाघमारे,आश्विन रामटेके,आकाश बाबर,आशिष वासनिक,भारत ठोबंरे,रोशन नागपुरे,सोमेश येडे, दिलीप गोंडेकर, समीर श्रीवास्तव, अमन शुक्ला,महादेव सेळके, गोपाळ कुळमेथे,सूरज भोयर, तुषार मुंदाने, तुषार प्रजापती, अभिषेक मेहरे आदी कार्यकर्ता पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.