नागपूर :- आदिम कर्मचारी संघटना नागपूर कडून प्रकाशगड बान्द्रा (पूर्व) मुंबई येथे नारे निदर्शने आंदोलन घेण्यात आले होते. त्याप्रसंगी महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मा.सं) सावळकर यांना पोलीसांमार्फत भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार एक तृटी वगळता सर्व लाभ मे २०२३ च्या वेतनात देण्यात येईल असे प्रशासकीय परिपत्रक निर्गमित केले. तर सायंकाळी ५ वाजता. महावितरणचे मा संचालक (मा.सं) भादीकर यांची भेट पोलीसांचे माध्यमातून भेट घेतली त्यांनी काही तृटी वगळता सर्व मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून उचित आदेश दिलेले आहे. तसेच आझाद मैदान, मुंबई येथे दि. ९/०५/२०२३ पासून सुरू असलेले बेमुदत उपोषणा दरम्यान एस.टी महामंडळाचे मा.महाव्यवस्थापक गायकवाड यांना पोलीसांचे माध्यमातून भेटून चर्चा केली त्यांनी शा.नि.नुसार सर्व लाभ लवकरच देण्यात येतील असे पत्र या संघटनेला दिले. तसेच या प्रधान सचिव ऊर्जा आभा शुक्ला यांना भेटून महावितरण व महानिर्मिती या विज कंपन्यांनी काढलेल्या परिपत्रक/पत्रामध्ये हेतुपुरस्सर ठेवलेल्या तृटींबाबत तक्रारी सादर केल्या.
त्या विज कंपन्यांकडून त्वरीत सुधारणा करून शा.नि.नुसार देय सर्व लाभ देण्याचे निर्देश देण्यात येतील असे आश्वासन दिले. आज दि.११/०५/२०२३ ला सकाळी मा सचिव (साविस) सा.प्र.वि.यांना भेटून शासनस्तरावरील मागण्यांचे निवेदन सादर केले त्यावर काही मागण्यांवर कार्यवाही सुरू असून लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल तसेच आपण सादर केलेल्या उर्वरीत मागण्यांवर उचित निर्णयासाठी प्रकरण सादर करण्यात येईल.असे आश्वासन दिले. त्यामुळे बहुतेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यामुळे आज दुपारी ४ वाजता बेमुदत उपोषण आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.