संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– दोन आरोपीस अटक, तीन आरोपी अजूनही अटकेबाहेर
कामठी ता प्र 6:-स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कादर झेंडा येथे मो सलमान यांच्या राहत्या घरी उधारीचे असलेले चार हजार रुपये मागण्यासाठी गेलेल्या मो मुजमिल कुरेशी यांच्याशी झालेला हा वाद विकोपाला गेल्याने आरोपी मो सलमान यांनी आरोपितांशी संगनमत करून लोखंडी रॉड वव स्टीलच्या झाराने डोक्यावर वार करून गंभीर जख्मि केल्याची घटना 29 एप्रिल ला रात्री 11 दरम्यान घडली असता यासंदर्भात जख्मि मो मुजमिल कुरेशी ला नागपूर च्या मेडिकल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान सदर जख्मि तरुणाचा आज सायंकाळी 7 दरम्यान मृत्यू झाल्याने जुनी कामठी पोलिसांनी आरोपी विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यातील भादवी कलम 307 मध्ये कलम वाढ करीत भादवी कलम 302 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून खुन झालेल्या तरुणाचे नाव मो मुजमिल कुरेशी वय 32 वर्षे रा बोरकर चौक ,शितला माता मंदिर जवळ कामठीअसे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून फिर्यादी मृतक मो मुजमिल ने जख्मि अवस्थेत दिलेल्या बयांना वरून सदर मृतक हा आरोपी मो सलमान वर असलेले चार हजार रुपयांच्या मागणीसाठी गेले असता दोघात झालेला हा शाब्दिक वाद विकोपाला जाऊन हाणीमारीत रूपांतर झाल्याने आरोपितांनी संगनमत करून मृतक मो मुजमिल कुरेशी च्या डोक्यावर लोखंडी रॉड व स्टील च्या झाऱ्याने डोक्यावर गेलेल्या गंभीर वार मुळे रक्तबंबाळ स्थितीत नागपूर च्या मेडीकल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते .या जख्मिचा आज सायंकाळी 7 दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेतील आरोपी मो सलमान मो इकबाल वय 24 वर्षे रा कादर झेंडा कामठी तसेच मो उमेर मो नियाज अहमद वय 19 वर्षे रा फुटाना ओली कामठी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असून 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तसेच या गुन्ह्यातील आरोपी मो माजिद रा इस्माईलपुरा कामठी, मो असलंम मो अयाज व सुफियान दोन्ही राहणार कोळसा टाल कामठी अजूनही अटकेबाहेर आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक भिताडे करीत आहेत.
@फाईल फोटो