कामठी :- संपूर्ण जगाला दया,क्षमा, शांतीची शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त कामठी येथील कोळसा टाल स्थित नवयुवक उत्सव मंडळ नागवंशी बुद्ध विहार येथे माजी नगरसेवक श्रावण केळझरकर व समस्त उपासक उपसिकांच्या मुख्य उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेऊन तथागत गौतम बुद्धाना वंदन करण्यात आले. व सामूहिक कँडल मार्च काढण्यात आले.हे कँडल मार्च डॉ बाबासाहेब आंबेडकर परिसर कोळसाटाल येथून निघून जयस्तंभ चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात कँडल मार्च चे समापन करण्यात आले.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
या सामूहिक कँडल मार्च च्या यशस्वी आयोजनासाठी माजी नगरसेवक श्रावण केळझरकर,विनोद आवळे,शैलेश पाटील,रवी गजभिये,अविनाश साखरे, निशांत पाटील, सुलोचना पाटील, सुकेशीनी पाटील,सुनीता मेश्राम,माया मेश्राम,छाया गजभिये, इंदू हुमने, पिंकी पाटील,रत्ना बोरकर,शिल्पा गजभिये, अनिता पाटील,प्रियंका नगरकर आदीनी मोलाचे परिश्रम घेतले.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)