– ५२ ताश पत्ते, मोबाइल सह ६१,७३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नऊ आरोपीना अटक.
कन्हान :- शहरातील सत्रापुर शिवारात कन्हान पोलीसांनी जुगार अड्यावर धाड टाकुन ५२ ताश पत्ते, सहा मोबाइल सह एकुण ६१,७३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन नऊ आरोपीला ताब्यात घेऊन पोस्टे ला नऊ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार पोलीस हवालदार मुदस्सर जमाल हे गुरुवार (दि.४) एप्रिलला सायंकाळी ४.१५ ते ५.५० वाजता पोस्टे ला हजर असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि सत्रापुर येथे एका घरात काही जुगारी ५२ ताश पत्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अश्या माहिती वरुन परिविक्षाधिन सहायक पोलीस अधिक्षक अनिल मस्के (भापोसे), सपोनि सी.बी चव्हाण, पो हवा हरीष सोनभ्रदे, पोना अतिश मानवटकर, पोशि वैभव बोरपल्ले, सम्राट वनपर्ती, पियुष वाढिवे आदी कर्मचा ऱ्यांनी सरकारी वाहनाने रवाना होऊन मौजा सत्रापुर येथे बुद्ध बिहारा समोरील दक्षिण मुखी घरी जाऊन पोलीस स्टाॅपच्या मदतीने धाड टाकली. सदर घराचे मागील खोलीत एकुण ९ इसम ५२ ताश पत्यावर पैशाची बाजी लावुन कट पत्तीचा जुगार खेळतांना मिळुन आले. कन्हान पोलीसांनी मिळुन आलेले जुगारी इसम १) राजेश पांडुरंग शेंडे वय ५३ वर्ष,२) युवराज भीमराव राखडे वय ६० वर्ष, ३) देवेश देवचंद पात्रे वय २२ वर्ष, ४) विजेंद्र बाबुराव मेश्राम वय ४३ वर्ष, ५) जैम पेंद्या इंचुकर वय ३३ वर्ष, ६) जुगनु दशरथ पात्रे वय ४२ वर्ष, ७) विनय सुदाम मंडाले वय ४१ वर्ष, ८) आशु नरेश पात्रे वय १९ वर्ष सर्व राहणार पंचशील नगर सत्रापुर कन्हान, ९) अनिल विजय मंडाले वय ३३ वर्ष रा. रामनगर कन्हान यांची पंचासमक्ष पोलीसांनी अंगझडती घेत १) राजेश शेंडे च्या ताब्यातुन १० ताश पत्ते व ३३०० रु नकदी, २) युवराज राखडे च्या ताब्यातुन ११ ताश पत्ते व १९४० रु नकदी, ३) देवेश पात्रे च्या ताब्यातुन १९७० नकदी, विवो कंपनीचा फोन ८,००० रु. असा एकुण ९,९७० रु. ४) विजेंद्र मेश्राम च्या ताब्यातुन १०२० रु नकदी, अपो कंपनी स्मार्ट फोन १२,००० रु असा एकुण १३,०२० रु, ५) जैन इंचुकर च्या ताब्यातुन २०० रु नकदी व अपो कंपनीचा स्मार्टफोन ८,००० रु असा एकुण ८,२०० रु, ६) जुनगु पात्रे च्या ताब्यातुन ३५० रु नकदी व नोकिया कंपनी चा फोन ५०० रु. एकुण ८५० रु, ७) विनय मंडाले च्या ताब्यातुन ४०० रु. नकदी व अपो कंपनीचा स्मार्टफोन ९,००० रु असा एकुण ९,४०० रु, ८) आशु पात्रे च्या ताब्यातुन २२० रु नकदी, ९) अनिल मंडाले च्या ताब्या तुन २०० रु नकदी व विवो वाय कंपनीचा स्मार्टफोन १०,००० असा एकुण १०,२०० रुपये असा मुद्देमाल मिळुन आला. तसेच डावावरुन ४,६३० रु नकदी व ३१ ताश पत्ते असा एकुण १४,२३० रु नकदी व जुगारी इसमांचे एकुण ६ मोबाइल किंमत ४७,५०० रु असा एकुण ६१,७३० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष पोलीसांनी घटनास्थळा वरुन मुद्देमाल जप्त करुन नऊ आरोपी ला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ला आणुन सरकार तर्फे फिर्यादी पोलीस हवालदार मुदस्सर जमाल यांचे तक्रारीवरून पोस्टे ला नऊ आरोपी विरुद्ध कलम ४ , ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास परि. सहायक पोलीस अधिक्षक अनिल मस्के (भापोसे), पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात सपोनि सी.बी चव्हाण सह पोलीस कर्मचारी करीत आहे.