अवघ्या एकाच दिवसात चोरीचा पर्दाफाश करण्यात जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त

– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 7:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या फेरूमल चौकातील पेंटच्या दुकानासमोर ठेवलेले 26 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 4 मार्च ला सकाळी साडे आठ वाजता घडली असता यासंदर्भात फिर्यादी उमेश टेकचंद बिचपुरीया ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करीत तपासाला गती देत पोलीस उपनिरीक्षक केरबा मकाने यांनी सुचविलेल्या तर्कशक्तीच्या आधारावर अवघ्या एक दिवसात चोरट्याचा शोध लावण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असून अटक आरोपीचे नाव विजय त्रिपाठी वय 34 वर्षे रा नयाबाजार कामठी असे आहे.या आरोपी कडून चोरीस गेलेला 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल तसेच आरोपीने चोरीचा माल वाहून नेण्यासाठी उपयोगात आणलेला तीन चाकी ऑटो किमती 2 लक्ष रुपये असा एकूण 2 लक्ष 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.kamptee
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार फेरूमल चौकात असलेल्या बिचपुरीया पेंट दुकानाच्या मालकाने विविध व्यापारी कडून पेंट चे 8 बॉक्स बोलवले असता 4 मार्च ला सकाळी 8 दरम्यान ट्रांस्पोर्ट कंपनीच्या लोकांनी सदर 8 बॉक्स खाली उतरवत पेंट च्या दुकानासमोर ठेवून गेले, दुकानदाराने ऑर्डर चा माल आल्याची खात्री करीत सकाळी साडे नऊ वाजता दुकानात आले असता दुकानासमोर ठेवलेले 8 पेंट चे बॉक्स कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास येताच पोलिसांकडे धाव घेतली यावर पोलीस उपनिरीक्षक कोरबा माकने व डी बी पथक यांनी संयुक्तरित्या केलेल्या तपासातुन अवघ्या एक दिवसात आरोपीचा शोध लावीत आरोपी विजय त्रिपाठी ला अटक केली व त्याच्याकडून चोरीस गेलेला 26 हजार 500 रुपये किमतीचे पेंट चे 8 बॉक्स व सदर माल वाहून नेण्यासाठी उपयोगात आणलेला आरोपी कडे असलेला तिनचाकी ऑटो क्र एम एच 49 ए आर 7015 किमती 2 लक्ष रुपये असा एकूण 2 लक्ष 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही डीसीपी मनीष कलवानिया, एसीपी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे, पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने, डी बी स्कॉड चे तंगराजन पिल्ले,गयाप्रसाद वर्मा, विवेक दोरसेटवार, अश्विन चहांदे,अमित, गोपाल टिके यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com