संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आंबेडकरी विचारधारेचे सामाजिक कार्यकर्ता दिवंगत अशोकभाऊ खोब्रागडे यांच्या प्रथम स्मूर्ती दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे कामठी शहर उपाध्यक्ष व दस्तलेखक सुभाष सोमकुवर यांच्या वतीने आज 18 एप्रिलला न्यू खलाशी लाईन स्थित धम्म साधना संघ बुद्ध विहार सभागृहात एक दिवसीय मोफत नेत्र तपासणी व दंत रोग तपासणी शिबिराच्या आयोजित कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिराचा शेकडोच्या वर लाभार्थ्यांनी लाभ घेतला.या शिबिराला नेत्र रोग तज्ञ डॉ दीपक रामटेके,दंत रोग तज्ञ डॉ मुक्ता पंडित,रंजित डोंगरे यांनी आरोग्य सेवा पुरविली.
या मोफत नेत्र रोग तपासणी व दंत रोग तपासणी शिबिराचे उद्घाटन पूज्य भन्ते नागदीपंकर यांच्या मुख्य उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.याप्रसंगी कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अविनाश ऊकेश, बरीएम कामठी शहर उपाध्यक्ष सुभाष सोमकुवर, राजेश गजभिये, प्रमोद खोब्रागडे, एल पी रामटेके, अरविंद मेश्राम, प्रमोद बेलेकर,राजेश मेश्राम, आनंद खोब्रागडे,नन्दा कांबळे,सीमा सोमकुवर,अर्चना सोमकुवर, महेश खोब्रागडे, विकास खोब्रागडे, रमाकांत पानतावणे, अतुल राऊत,नयन सोमकुवर,सुमित गेडाम यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी अनुभव पाटील,यश सोमकुवर, बंटी रामटेके, पियुष मेश्राम, छोटू बेलेकर, सुनील लांबट, प्रवीण लांजेवार, सनी मेश्राम,विकास निकोसे, राहुल रंगारी,रोशन शेंडे, अभिषेक बेलेकर, हितेश खोब्रागडे, नयन सोमकुवर,गोल्डी निकोसे,रोशन देशभ्रतार ,कैलास खोब्रागडे,विलास खोब्रागडे, अर्पणा लांजेवार, माया रामटेके,सत्यफुला खांडेकर,लीलाधर खोब्रागडे, मयूर मोटघरे, सीमा सोमकुवर, बबिता पानतावणे, मनुबाई रामटेके,मंदा खोब्रागडे आदींनी मोलाची भूमिका साकारली.