महिमा बहुउद्देशीय संस्था द्वारे नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचा वाढदिवस संपन्न 

नागपूर – भारतीय बालहक्क चळवळकर्ते व नोबेल शांतता पारितोषिक विजेते तसेच बालमजूरी उच्चाटनाचे काम करणाऱ्या बचपन बचाओ आंदोलनाचे प्रणेते  आदरणीय कैलास सत्यार्थी यांचा वाढदिवस महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपूर यांच्या माध्यमातून संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितल पाटील यांच्या अध्यक्षते खाली मानकापुर येथील राजनगर, झोपडपट्टी येथील आर्थिक परिस्थिती ने कमकुवत असलेल्या बालकांना वही, पेन चे वाटप करून साजरा करण्यात आला. या प्रसंगी बालकांनी अगदी आनंदीत होऊन सहभाग घेतला.

            या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या संगीता किशोर वारके, महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सचिव- बरखा मदन सोंगले, शामला अशोक नायडू, गगन भरारी बहुउद्देशीय संस्थेच्या बरखा पाटील, फिल ॲण्ड गूड फाऊंडेशनचे अभीमन्यु सर, संकेत देवगडे सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक गणमान्य उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

गुणवत्ता पुर्ण शिक्षणासाठी प्रथम अध्ययन स्तर निश्चित करा

Sat Jan 15 , 2022
– गटशिक्षणाधिकारी तभाने मॅडम यांची वाचन प्रकल्पांतर्गत शाळांना भेटी, सुचना व मार्गदर्शन.  कन्हान : – गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येका पर्यंत गुणव त्तापुर्ण शिक्षण पोहचविण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करून मग वाटचाल केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा योग्य उपयोग होईल, असे आवाहन वाचन प्रकल्प निरीक्षक व रामटेक पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तभाने मॅडम यांनी केले.           […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!