संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-बाबा जुमदेवजीच्या 102 व्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत व महाप्रसाद वितरण
कामठी :- परमात्मा एक सेवकचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त परमात्मा एक सेवक मंडळ कामठीच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रा मिरवणुकीत अनुयायांनी केलेल्या महाणत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम च्या गजराने कामठी शहर दुमदुमले. परमात्मा एक सेवक मंडळ कामठीच्या वतीने नेहरू मंच मोंढा येथे सजविलेल्या रथावर महानत्यागी बाबा जुमदेवजी च्या प्रतिमेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सेविका सरस्वती मोहतुरे यांचे हस्ते पूजा प्रार्थना करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली यावेळी ज्येष्ठ सेविका मार्गदर्शिका मंजुला अच्छेवार , श्रावण सावरकर, रमेश नखाते ,दामोदर मोहतुरे, ,दिलीप बाँडेबुचे, दिलीप मते, चंदू पडोळे ,प्रतीक पडोळे , प्रदीप भोकरे, आकाश भोकरे,आसाराम हलमारे ,नरेश भंनारे ,कृष्णा केवलकर, अलंकेश लांजेवार आदी उपस्थित होते.डीजे, बँड ,फटाक्याच्या आतिषबाजीत निघालेली मिरवणूक नेहरू मंच मोंढा मेन रोड ,हैदरी चौक, मोटर स्टॅन्ड चौक ,जयस्तंभ चौक ,जय भिम चौक ,पारसीपुरा, मरार टोळी, भूषण नगर, पंकज मंगल कार्यालय चौक रनाळा नगर भ्रमण करीत वर्धमान नगर येथील सेवक मंडळाच्या कार्यालयात शोभायात्रेचे समापन करण्यात आले. ठिकठिकाणी नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत करून प्रसादाचे वितरण केले.
दरम्यान बाबा जुमदेव यांच्या जयंतीनिमित्त निघालेली शोभायात्रा मोटर स्टँड चौकात पोहोचली असता माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांच्या हस्ते अनुयायांना भव्य महाप्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी बाबा जुमदेवजी यांचे कार्य व व्यसनमुक्ती यावर मार्गदर्शन केले तसेच समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तसेच गोरगरिबांना व्यसनमुक्तीचा सल्ला देत व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी बाबा जुमदेवजी यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा वसा सेवक व सेविकांनी घेऊन व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवे, असे प्रतिपादन माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले. याप्रसंगी आकाश भोकरे,राजकुमार गेडाम व आशिष मेश्राम सह आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
बाबा जुमदेव यांची जयंती शोभायात्रा यशस्वीरीत्या पार पडली असून याप्रसंगी परमपूज्य परमात्मा एक सेवक बहुउद्देशीय संस्था कामठी चे प्रदीप भोकरे, हरीश भोयर, रवी मोहतुरे, रमेश नखाते, श्रावण सावरकर, रवी देवतळे, एस. लुटे, मनीष नखाते यांच्यासह सेवक व सेविका उपस्थित हाेत्या.