चोरी प्रकरणातील पाच आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यशप्राप्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोटर स्टँड कामठी मार्गावरील भारत मशीन वर्क्स मधून अज्ञात चोरट्यानी 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 29 मार्चच्या रात्री 10 वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी विकास जांगळे वय 49 वर्षे रा गुरुकृपा कॉलोनी कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द भादवी कलम 481,380 अनव्ये गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली असता पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत आरोपीचा शोध लावण्यात यश गाठून पाच आरोपीना अटक करण्यात आले.

अटक पाच आरोपीमध्ये शफिक शेख वल्द शेख मैनू वय 29 वर्षे , गगन थुल वय 25 वर्षे ,शेख सलमान उर्फ अब्बू काल्या शेख हुसेन वय 23 वर्षे,राजा सुनील वैरागडे वय 23 वर्षे,सलमान उर्फ दददू ताहीर हुसेन वय 20 वर्षे सर्व रा.अब्दुल्लाह शाह दरगाह कामठी असे आहे. ही यशस्वी कारवाही डी सी पी श्रवण दत्त, एसीपी नरवाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत शिरसागर, दुय्यम पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, डीबी पथकाचे पोलीस हवालदार संदीप सगणे,नाईक पोलीस कॉन्स्टेबल संदेश शुक्ला, पोलीस कॉन्स्टेबल कमल कनोजिया,अनिकेत सांगळे, सुरेंद्र शेंडे, यांनी केली आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णामध्ये वाढ

Fri Mar 31 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- वातावरणातील बदलामुळे कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात नागरिकांच्या प्रकृतीवर व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम झाल्याने उपचारासाठी खाजगी आणि सरकारी रुग्णालयात रुग्णांची मोठी संख्या दिसून येत आहे. कामठी तालुका प्रशासनाने एच 3,एन 2 याबाबत देखील खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे. कामठी तालुक्यातील अनेक नागरिकांना खोकला,सर्दी,ताप ,अंगदुखी ,गरगरने यासारखे परिणाम दिसून येत आहेत. राज्यभरात एच 3,एन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!