नागपूर – स्वराज्याचे संस्थापक, बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री व प्रथम गुरु मा जिजाऊ यांची 425 वी जयंती आज बसपाच्या नागपूर शहर कार्यालयात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, महिला जिल्हा प्रभारी वर्षाताई वाघमारे, महिला जिल्हाध्यक्ष सुरेखाताई डोंगरे यांनी माल्यार्पण करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर जिल्हा सचिव नितीन वंजारी ह्यांनी, सूत्रसंचालन दक्षिण नागपूरचे सचिव सचिन कुंभारे, यांनी तर समारोप नागपूर शहर महासचिव विलास मून यांनी केला. याप्रसंगी नागपूर शहर प्रभारी शंकर थुल, दक्षिण-पश्चिम चे माजी अध्यक्ष सदानंद जामगडे प्रामुख्याने उपस्थित होते.