विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागामध्ये नुकतीच विज्ञान दिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. 25 फेब्राुवारी ते 15 मार्च पर्यंत राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने विद्यालय, महाविद्यालय स्तरावर विविध वैज्ञानिक उपक्रम, संशोधन, प्रात्याक्षिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान प्रदर्शनी निमित्ताने शाळा, विद्यालये व महाविद्यालयातील विद्याथ्र्यांच्या विचाराला चालना, संशोधनाला संधी आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून विद्याथ्र्यांचा विकास जागतिक स्तरावर व्हावा म्हणून डॉ. सी.व्ही. रमण यांचे जयंती निमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागात विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले होते.                विद्यापीठातील विविध विभागात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन 25 फेब्राुवारी ते 15 मार्च दरम्यान करण्यात येत आहे. भौतिकशास्त्र विभागात अमरावती शहरातील ज्ञानमाता विद्यालय, विजया कॉन्व्हेंट, के.के. केंब्रिाज इंटरनॅशनल स्कुल, पोदार इंटरनॅशनल स्कुल, नारायणा विद्यालय इत्यादी शाळेतील विद्याथ्र्यांचा सहभाग विज्ञान प्रदर्शनात संधोधन सादरीकरण करण्यासाठी होता. तसेच पदविधर शाखेतील वाणिज्य विभाग अकोला, श्री शिवाजी कॉलेज अमरावती, प्राणिशास्त्र विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग तर, विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाचे सुक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान व भौतिकशास्त्र या शाखेतील विद्याथ्र्यांचा सहभाग होता.              25 फेब्राुवारी ते 15 मार्च पर्यंत राष्ट्रीय विज्ञन दिनाचे निमित्ताने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात डॉ. सी.व्ही. रमण यांची जयंती साजरी करतांना प्रमुख अतिथी एस.कुमार, डॉ. डुडुल, डॉ. प्रगती गोखले, डॉ. अनिता पाटील, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, डॉ. सुलभा पाटील यांनी भौतिकशास्त्र विभागात विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन डॉ. के.जी. देशमुख सभागृहात संपन्न झालेल्या विज्ञान दिनानिमित्त जाहीर केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रनर निकिता राउत डोपिंग टेस्ट में हुई फेल, नाडा ने लगाया तीन साल का बैन

Sat Mar 4 , 2023
नागपुर: अंतराष्ट्रीय रनर निकिता राउत (International Runner Nikita Raut) पर तीन साल का बैन लग गया है। डोपिंग टेस्ट में फेल होने के बाद राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्था (NADA) ने रविवार को यह कार्रवाई की। इसकी सुचना एथलेटिक इंटीग्रिटी यूनिट (AIU) को दे दिया है। ज्ञात हो कि, निकिता शहर की तीसरी खिलाडी है जिस पर एंटी डोपिंग कार्रवाई की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com