नागपूर :-आदिवासी नायक जल, जमीन व जंगलसाठी इंग्रजांशी संघर्ष करुन वयाच्या 25 व्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती देणारे प्रथम क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या 147 व्या जयंती निमित्त नागपूर जिल्हा बसपा चे अध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वात फुटाळा तलाव परिसरातील बिरसा मुंडांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी जयभीम जयसेवा, दलित आदिवासी ओबीसी एकता जिंदाबाद, बिरसा मुंडा के सन्मान में बीएसपी मैदान मे, बिरसा मुंडा आपका मिशन अधूरा बीएसपी करेगा पुरा, अब बहुजन की बारी है जल, जमीन, जंगल हमारी है, जो बहुजन की बात करेगा वह दिल्ली से राज करेगा, व्होट हमारा राज तुम्हारा नही चलेगा, नही चलेगा, महापुरुषो के सन्मान में बीएसपी मैदान मे, संविधान के सन्मान में बीएसपी मैदान मे, आदि स्फूर्तीदायक नारे देऊन धरती के आबा बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने पश्चिम नागपूरचे अध्यक्ष सनी मुन, बबीता डोंगरवार, जिल्हा सचिव अभिलेख वाहने, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, राजकुमार बोरकर, माजी शहर प्रभारी योगेश लांजेवार, एडवोकेट वीरेश वरखडे, विनोद सहाकाटे, सुंदर भलावी, सदानंद जामगडे, सुधाकर सोनपिपळे, चंद्रसेन पाटील, मनोज गजभिये, श्रीकांत बडगे, आनंद सायरे, सुमंत गणवीर, जनार्धन मेंढे, राजेंद्र सुखदेवे, ओपुल तामगाडगे, गौतम लोखंडे, उत्तम सायरे आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.