अमरावती – गुरू नानक देव युनिव्हर्सिटी, अमृतसर येथे 19 ते 21 मार्च, 2023 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वॉटर पोलो (पुरुष) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित झाला असून खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दिनांक 08 ते 16 मार्च दरम्यान होणार आहे.
खेळाडूंमध्ये भारतीय महाविद्यालय, अमरावतीचा यश दुर्गे व आदित्य थेटे, युवाशक्ती शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा विशाल महाजन, विद्यापीठातील पी.जी.टी.डी.कॉम्प्युटर सायन्सचा कौस्तूभ गाडगे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा वेदांत सराफ, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा हार्दिक प्रजापती, लवकेश उदापूरकर, चर्वाक भोंडे व पार्थ हिवसे, सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीचा वेदांत काकड, उत्कर्ष थोरात व आलोक देशमुख, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा संकेत साखरे, सुमित मोहोड, अनिरुध्द गुप्ता व अथर्व हिंगमिरे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा पार्थ अंबुलकर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीचा राज उमाठे याचा समावेश आहे. सर्व खेळाडंूनी प्रशिक्षण शिबिराला उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.