संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी : सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय , कामठी येथील इयत्ता १२वि विज्ञान शाखेचा विद्यार्थी इशांक तेलंग ह्याने हातोडा फेक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ५२.५२ मीटर हातोडा फेकून प्रथम स्थान प्राप्त केले असून त्याची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आहे.
ह्या स्पर्धेचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल, मताळुंगे, बालेवाडी, पुणे-४५ येथे दि. २९ ते ३१ जानेवारी २०२३ ला आयोजित केले होते. इशांकला पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा प्राध्यापिका मल्लिका प्रभाकरराव नागपुरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण तसेच पर्यवेक्षक प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, वंजारी तसेच इतर सर्व प्राध्यापकवृंदांनी अभिनंदन करून इशांकला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.