पवारांचा खरा वारसदार आणि उद्धवजी कसे बेजबाबदार…

नेतृत्वाच्या सर्वोच्च उंचीला पोहोचलेला कोणताही कुठलाही नेता आपल्याच रांगेत आपल्या खांद्याला खांदा लावून बसलेला आपल्या उंचीचा आपल्या तोडीचा अन्य नेता कधीच तयार करणार नाही पण धडपडणाऱ्या पुढे जाऊ पाहणाऱ्या मोठे होऊ बघणार्या अन्य प्रतिस्पर्ध्याला तो संधी देणारच नाही असे कधीही होत नाही म्हणजे अगदी शरद पवारांनी देखील आजतागायत आपल्या हयातीत अन्य शरद पवार भलेही उभा केला नाही पण सभोवताली किंवा राष्ट्रवादीच्या अनेकांना त्यांनी संधी उपलब्ध करून दिल्या, याला या राज्यात एकमेव अपवाद उद्धव ठाकरे ज्यांनी अनेकांना कित्येकांना केवळ मोठा होतोय म्हणून जमीनदोस्त केले उध्वस्त केले त्यातले काही स्वबळावर टिकले पण अनेक असंख्य राजकीय प्रवाहातून बाजूला पडले अनेकांचे नामोनिशाण मिटले अनेक निराश झाले, मुकेश पटेलांसरखे काही तर थेट देवाघरी निघून गेले किंवा कित्येकांचा स्मिता ठाकरे झाला. मला धाडसी मुलगा असता तर अजितदादांच्या नक्की पुढे निघून गेला असता, शरद पवारांनी अलीकडे जवळच्या मित्राजवळ व्यक्त केलेली खंत कारण धडपड प्रयत्न करून विविध संधी उपलब्ध करूनही नेतृत्वात शरद पवारांच्या अगदी जवळपास देखील कन्या सुप्रिया पोहोचू न शकल्याने अन्य एखादा पवार कुटुंबातला रोहित सारखा किंवा जयंत पाटील यांच्यासरखा एखादा बाहेरचा पराक्रमी लायक उत्साही वारसदार शोधण्याचा नाही म्हणायला शरद पवार यांनी खूप प्रयत्न केला डोळ्यात तेल घालून चाचपणी देखील केली पण राज कपूर नंतर ऋषी कपूर त्यांना कोणतही न दिसल्याने त्यांची आधी मोठी निराशा झाली आणि कायम निराशेवर मात करण्यासाठी त्यांनी काहीच दिवसांपूर्वी मग तो निर्णय अखेर घेतला…

अलीकडे पवारांनी एकट्यात एकांतात अजितदादांना बोलावून घेतले आणि ते भावनिक होत म्हणाले, मला माझी राजकीय निवृत्तीचे आता मात्र नक्की वेध लागले आहेत, आपल्या दोघात काही वेळा शाब्दिक चकमकी झाल्या पण तेवढ्यापुरत्या काही गैरसमज एकमेकात एकमेकांविषयी झाले पण हे सारे आपण आता येथेच यापुढे विसरायला हवेत,माझ्या निवृत्ती नंतर तुम्हीच माझे खरे राजकीय वारसदार मात्र सुप्रिया एकटी पडणार नाही, कायमची राजकारणातून आणि समाजकारणातून कायमची घरी बसणार नाही असे काहीही करू नका, रोहित पवारांना कमी लेखू नका त्याला देखील आपल्याला काकांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीत सावत्र वागणूक मिळते असे वाटून त्याने भाजपाचा रस्ता धरावा असे अजिबात घडता कामा नये, थोडक्यात शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीनंतर त्यांचा खरा राजकीय वारसदार आता त्यांनी स्वतःच ठरविलेला आहे आणि ते अन्य कोणीही नसून त्यांनी त्याची स्पष्ट कल्पना अजित आणि घरातल्या व बाहेरच्या जवळच्या विश्वासू मंडळींना दिलेली आहे, माझे यातले एकही वाक्य खोटे ठरले तर मी पत्रकारितेतून निवृत्त होईल किंवा उदय तानपाठकच्या घरी वर्षभर फुकटात स्वयंपाक करायला जाईल किंवा अनिल थत्ते यांचे मेकअप वर्षभर माझ्या हाताने करून देईल. अर्थात शरद पवार यांचे पुढले वारसदार अजित पवार या धक्क्याने या बातमीने पवारांच्या निरोपाने जयंत पाटलांसरखे काही अस्वस्थ आहेत तर अजित दादांचे मुक्री प्रमोद हिंदुराव यांच्यासारखे काही खूप खुश झालेले आहेत…

शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीनंतर कदाचित जयंत पाटील रोहित पवार इत्यादी फार पूर्वी ठरल्याप्रमाणे पक्षांतर करतील तर सुनील तटकरे यांच्यासारखे दादांचे काही विश्वासू भाजपामध्ये प्रवेश करण्याचा इरादा बाजूलाही ठेवतील मात्र तुमच्याही ते लक्षात आलेच असेल कि अलिकडल्या काही दिवसात शरद पवारांपेक्षा राष्ट्रवादीतर्फे अजितदादा पक्षाचा प्रचाराचा सभांचा बैठकांचा आरोपांचा अगदी फ्रंटवर येऊन लढा देत असतांना तिकडे दस्तुरखुद्द सुप्रिया सुळे मात्र काहीशा मोठ्या प्रमाणात अलिप्त भूमिका घेतांना दिसतात त्याचवेळी शरद पवार स्वतः त्यांच्या राष्ट्रवादीत किंवा राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील त्यांना प्रमोट करतांना दिसतात,त्यांच्या पक्षाची राज्यातली राजकीय फ्रंट अजितदादा दररोज सांभाळतांना तुम्हालाहि ते तसे दिसले वाटले असेल. अर्थात अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीसमोर यानंतर नजीकच्या काळात एक मोठा धोका किंवा गंडांतर येणार आहे त्यातून ते सारे कसे सहीसलामत बाहेर पडतात कि त्यांचाही उद्धव ठाकरे होईल हे काळ ठरवेल कारण नेमका धोका भाजपापासून आहे जे उद्धव यांचे भाजपाने केले तेच स्वप्न त्यांचे या राज्यातल्या राष्ट्रवादी बाबत आहे त्यांना राज्यातली राष्ट्रवादी कमकुवत करून पुढे पार नेस्तनाभूत करायची आहे आणि भाजपा वरिष्ठ नेते सारे काही अगदी ठरवून योजनाबद्ध करतात घडवून आणतात त्यांच्या या राजकीय हल्ल्याला अजित पवारांनी हिमतीने आणि नियोजनपूर्वक तोंड दिले तर अजितदादा आणखी मोठे होतील अन्यथा अजित दादा उद्धव तर पार्थ पवार पुढले आदित्य असतील…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अभियंता वांधवकर की भ्रष्ट प्रवृत्ति का नतीजा PWD की सड़कों की हजामत 

Mon Feb 27 , 2023
नागपुर :- नागपुर जिले के ग्रामीण अंचल मे PWD की सडकों के बनते ही परखच्चे उड रहे हैं। नतीजतन वाहन चालकों को काफी परेशानियों का सामना करना पड रहा है।तत्संबंध मे आल इंडिया सोसल आर्गेनाइजेशन के अध्यक्ष एवं वरिष्ठ समाज सेवी पत्रकार टेकचंद्र सनोडिया शास्त्री का कहना है कि ग्रामीणों ने की शिकायत के बावजूद भी PWD के राज्य मंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com