संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शासकीय नियमानुसार शाळा ,महाविद्यालय तसेच शालेय, महाविद्यालय वस्तीगृहापासून 100 मीटर अंतराच्या आत गुटखा वा तंबाकुजन्य पदार्थाचो विक्री करण्यात येऊ नये असे असतानाही स्थानिक प्रशासनाच्या अभयपणामुळे कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात सर्रास गुटखा व तंबाकुजन्य पदार्थाची विक्री करण्यात येत असून अशा विक्रेत्यांवर कारवाही करण्याऐवजो स्थानिक पोलीस व अन्न औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी आपले आर्थिक स्रोत वाढविणाऱ्यावर भर देत असल्याने तालुक्यात गुटखा तसेच तंबाकुजन्य पदार्थाची विक्री जोमात सुरू आहे.
राज्यात गुटखा तसेच तंबाकुजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असताना सुद्धा कामठी तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटखा तसेच तंबाकुजन्य पदार्थाची विक्री खुलेआम पद्ध्तीने जोमात सुरू आहे. अशा व्यवसायिकांवर कार्यवाही करण्याची जवाबदारी पोलीस तथा अन्न व औषधी प्रशासन अधिकाऱ्यांची आहे मात्र कामठी तालुका अशा कार्यवाही साठी अपवाद ठरत आहे.तर उलट अन्न व औषधी प्रशासन विभाग धृतराष्ट्रांची भूमिका घेत आहे.
लगतच्या तेलंगणा राज्यातील आदीलाबाद येथुन येथील व्यापाऱ्यांकडे गुटखा व तांबकुजन्य पदार्थ उतरविण्यात येत आहे.याची माहिती सुदधा पोलीस तथा अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना असल्याची ओरड सुरू आहे.मात्र आर्थिक लाभपोटी वरील दोन्ही विभागाचे अधिकारी गुटखा व तंबाकूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यावर कारवाही करीत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
@ फाईल फोटो