नागपूर :- 14 नोव्हेंबर रोजी महालेखापरिक्षक ( लेखापरिक्षण )-II ऑडिटभवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथील कार्यालयात सकाळी क्षेत्रीय भारतीय लेखा आणि लेखापरीक्षाविभागाच्या प्रादेशिक प्रशिक्षणसंस्थेच्या महासंचालिका लता मल्लिकार्जुन यांच्या हस्ते “ऑडिटअहवाल प्रदर्शन” च्या उद्घाटनाने लेखापरिक्षण (ऑडिट) सप्ताहाचा प्रारंभ झाला , प्रादेशिक प्रशिक्षणसंस्था, नागपूर. महालेखापरिक्षक( लेखा – परिक्षण ) आणि पोस्टल अँड टेलिग्राफ (ऑडिट), नागपूर यांनीसंयुक्तपणे या सप्ताहाचे आयोजन केले आहे. हे ऑडिट अहवाल प्रदर्शन 30नोव्हेंबर पर्यंत सर्वांसाठी खुले असेल.
प्राधिकरण, उद्देश,कार्ये, आंतरराष्ट्रीय स्तर, ऑडिटसाधने आणि तंत्रे, ऑडिटचे प्रकार आणि त्याचे परिणाम याप्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. या प्रदर्शनात पोस्टर्स,ऑडिओ व्हिज्युअल, कॅगचे विविध अहवालही प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
नागपूरचे नागरिक प्रदर्शनाच्या स्लाइड्सवर आधारित प्रश्नमंजुषेचे उत्तर देऊन भेटवस्तू जिंकू शकतात.या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी महालेखाकार (लेखा परिक्षण-2) प्रविणकुमार, तिरुपती वेकेंटस्वामी , उप महालेखापरीक्षक (प्रशासन ) पल्लवी होळकर, उप महालेखापरीक्षक नरेश कुमार मन्ने, ,वरिष्ठ महालेखापरीक्षक दिनेश माटे प्रामुख्याने उपस्थित होते.