संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राज रॉयल लॉन मध्ये आयोजित भावाच्या लग्न समारंभात दोन बहिणींनी एका लाईट पिंक रंगाच्या बॅग मध्ये सोन्या चांदीचे दागिने,मोबाईल, पॅन कार्ड, रोख रक्कम भरून ठेवत लग्न समारंभात व्यस्त असताना कुणितरी अज्ञात चोरट्याने नजर चुकीने बॅग चोरून नेल्याची घटना काल दुपारी दीड वाजता घडली .या घटनेत बॅग मध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने,रोख रक्कम ,मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण 8 लक्ष 37 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निदर्शनास आले असून यासंदर्भात फिर्यादी पूजा शाहू वय 25 वर्षे रा भवानी नगर पारडी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.