कायम योग वर्गात परिवर्तित झाली योग शिबिरे

– ५६ योग वर्ग कायमस्वरूपी सुरु

– १३४०० नागरीकांनी घेतला लाभ

चंद्रपूर  :- चंद्रपूर महानगरपालिका, पतंजली योग समिती व योगनृत्य परिवाराद्वारे अनुक्रमे २२ व २४ जानेवारी पासुन चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी योग शिबिरे घेतली जात आहेत. या शिबिरांचा आतापर्यंत १३४०० नागरीकांनी लाभ घेतला असुन यातील संपुर्ण म्हणजे ५६ शिबिरांचे कायम योग वर्गात परीवर्तन झाले आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र व पतंजली योग समिती – योगनृत्य परीवाराच्या संयुक्त विद्यमाने रोगमुक्त चंद्रपूर अभियानाची सुरवात करण्यात आली आहे.निरोगी व स्वास्थ्य आरोग्य ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, व्यसनमुक्ती,रोग प्रतिकारात्मक शक्ती वाढविण्यासाठी ही योग प्राणायाम व आरोग्य शिबिरे आयोजीत करण्यात आली असुन जे नागरीक योग वर्ग व त्याद्वारे होणाऱ्या लाभापासुन वंचित आहे त्या सर्वांसाठी ही शिबिरे घेतली जात आहेत. याद्वारे योगचा प्रचार प्रसार होण्यास मदत मिळत असुन शहरातील नागरीकांचे स्वास्थ्य निरोगी राखण्याचे कार्य केले जात आहे.

नियमित योगसाधना करणारे शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वस्थ व स्थिर असतात. आपण योगाभ्यास केला किंवा योग नृत्य केले तर सुदृढ आणि शांत स्थिर मन, मेंदूला प्रोत्साहन मिळुन लवचीक व बळकट शरीर,ताण-तणाव कमी होणे, डिप्रेशन कमी होणे, ह्रदयाचे आरोग्य सुदृढ राहणे, वजन नियंत्रणात राहणे, उत्साहीपणा हे फायदे मिळतात.

सध्या पतंजली योग समितीद्वारे ८५ तर योगनृत्य परीवाराद्वारे ५७ केंद्रांवर योगवर्ग शहरात घेतले जातात. मात्र जे नागरीक योग वर्ग व त्याद्वारे होणाऱ्या लाभापासुन वंचित आहे त्या सर्वांसाठी मनपाद्वारे योग शिबिरे घेतली जात आहेत. योग समिती, योगनृत्य परिवार व मनपा यांची संयुक्त योग समितीद्वारे २८ योग वर्ग व २८ योगनृत्य वर्ग असे एकुण ५६ वर्ग घेतले जात आहेत. या योग शिबिरांचा अधिकाधिक नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.याकरीता मनपा आरोग्य विभाग येथे किंवा ९१७५९२५७८२ या क्रमांकावर संपर्क करून नागरीकांना नोंदणी करता येत आहे.

आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ, वनिता गर्गेलवार,गोपाल मुंधडा, डॉ. सपनकुमार दास यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात अंजली साटोणे, स्मिता रेभनकर,नसरीन शेख, अपर्णा चिडे, ज्योती मसराम, विजय चंदावार, कविता मंघानी ,रमेश ददभाल, सपना नामपल्लीवार, नीलिमा शिंदे, ज्योती राऊत, कल्याणी येडे तर योगनृत्य परिवाराचे विशाल गुप्ता, सुरेश घोडके आकाश घोडमारे, मुग्धा खांडे, पूनम पिसे,मीना निखारे तसेच सर्व मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या द्वारे कायम योग वर्ग सुरु ठेवण्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले जात आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत फेरीवाल्यांना देण्यात आले परिचय बोर्ड  

Thu Feb 16 , 2023
– मनपातर्फे शहरातील १९५० फेरीवाल्यांना देण्यात येणार परिचय बोर्ड   चंद्रपूर :- पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत शहरातील १९५० नोंदणीकृत फेरीवाल्यांना परिचय बोर्ड देण्याचा उपक्रम महानगरपालिकेतर्फे राबविल्या जात आहे. या उपक्रमाची सुरवात आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ६ पथविक्रेत्यांना परिचय बोर्ड तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश असलेले पत्र देऊन करण्यात आली. यात ज्या पथविक्रेत्यांनाही पंतप्रधान स्वनिधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com