विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी-20 परिषद आयोजनाबाबत आढावा बैठक

नागपूर : नागपूर येथे मार्च महिन्यात आयोजित होणाऱ्या जी-20 परिषदेच्या आयोजनाबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक पार पडली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी., सहायक पोलिस आयुक्त अश्वती दोर्जे, जी-20 अयोजन समीतीचे सौशेरपा स्वदेश सिंह, किरण डि . एम. आदी उपस्थित होते.

21 आणि 22 मार्च 2023 दरम्यान नागपुरात जी-20 परिषदेचे आयोजन होणार आहे. यात 27 देशांतील 60 प्रतिनिधींसह भारतातील जवळपास 140 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या उदघाटनापासून ते समारोपापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत तसेच या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विज्ञान प्रदर्शनीत तिडके शाळा अव्वल

Fri Jan 13 , 2023
बेला : 9 व 10 जानेवारीला विजय विद्यालय चांपा येथे आयोजित करण्यात आलेल्या उमरेड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत बेला येथील विमलताई तिडके विद्यालयाच्या पियुष अनिल फुलपाटिल या विद्यार्थ्याच्या ‘ रोबोटिक बग्गी (कार) ‘ या प्रतिकॄतीस तालूक्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पियुष व विज्ञान शिक्षक बी.बी. मून यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा विज्ञान प्रदर्शनीकरीता या प्रतिकृतीची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com