नागपूर :- ट्राफीक नियमांचे पालन करणाऱ्यांना तर दंड केल्या जातो पण नियमांचे पालन करून गाडी चालवणाऱ्या चालकांना आता बक्षीस मिळणार आहे. 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या विज्ञान प्रदर्शनीत याबाबत माहिती देण्यात आली.
रस्ते वाहतुक मंत्रालय व नागपूर महानगर पालिका यांच्या सहकार्यातून एका खाजगी कंपनीद्वारे नागपूर शहरात प्रायोगिक स्तरावर पुढील महिण्यात हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असल्याचे प्रदर्शनीत माहिती देण्यात आली.
ट्राफीक रिवार्ड या ॲपद्वारे नोंदणी करणाऱ्या वाहनचालकांना त्यांचे वाहनावर लावण्यासाठी एक रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटीफीकेशन डीव्हाइस घरपोच मिळेल. या डिव्हाइसची फ्रीक्वेंसी कॅच करण्यासाठी वेस्ट हाय कोर्ट रोड ते जपाणी गार्डन रोड या मार्गावर प्रायोगिक स्तरावर 10 सिग्नलवर सेंसर लावण्यात आले आहेत. हे सेंसर सिंग्नलसोबत जोडण्यात आले असून आपली गाडी लाल, पिवळ्या व हिरव्या सिग्नलचे पालन करते का याची तपासणी करेल. नियमाचे पालन करणाऱ्या वाहनचालकाच्या मोबाईल ॲप खात्यात प्रत्येक सिग्नलवर 10 रिवार्ड पांईट जमा करण्यात येतील. या रिवार्ड पॉइंटचा उपयोग विविध कंपण्यांची उत्पादने खरेदी करतांना सुट मिळविण्यासाठी करता येणार आहे.