संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
-सरपंचाला दोन मते देण्याचा अधिकार प्राप्त
-सरपंचांचे आले अच्छे दिन
कामठी ता प्र 28 :- नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचाची थेट नागरिकांच्या मतदानातून निवड करण्यात आली असून उपसरपंच पदासाठी निवडणूक ही सरपंच च्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत आहे . या निवडणुकीत सरपंचाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला नव्हता मात्र उमेदवारांना समान मते पडल्यास सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार शासनाने दिला होता तर या विशेष मताधिकार चा कित्येक सरपंचांनी वापर सुद्धा करून घेतला मात्र आता यापुढे उपरपंचाच्या निवडणुकीत सरपंचाला दोन मते घालण्याचा विशेषाधिकार प्राप्त झाला आहे ज्यामध्ये समान मते मिळाली तर निर्णायक मत देणे तसेच अतिरिक्त मताधिकाराचा समावेश आहे.यामुळे आता सरपंचाला उपसरपंच पदाच्या निवडणुकीत दोन मते देण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे ज्यामुळे सरपंचाच्या विशेषाधिकारात अजून वाढ करण्यात आली आहे.
शासनाच्या या नव्या निर्णयामुळे सरपंचांना आता उपसरपंच पदासाठी मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे परंतु वेळप्रसंगी उपसारपंचाचे निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांना समान मते मिळाली तर निर्णायक मत देण्याचा अधिकार सुद्धा सरपंचांना वापरता येणार आहे यामुळे उपसरपंचपदी सहसा विराजमान होता येणार आहे तर शासनाचा हा निर्णय कुठल्या एका विशिष्ट पक्षाच्या सरपंचासाठी काढला नसून सर्व सरपंचांना लागू आहे त्यामुळे सरपंचाच्या विशेषाधिकारात अजून वाढ करण्यात आल्याने नुसत्या भाजपचेच नाही तर सर्व पक्षातील व अपक्ष सरपंचाचे अच्छे दिन आले आहेत.
@फाईल फोटो