मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान नगर पांधन रोड कन्हान आठवडी बाजार येथील तांबे यांचे घरा जवळुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने दुचाकी वाहन चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.२३) डिसेंबर ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान कैलाश सकाराम बडवाईक वय ३९ वर्ष राह. राधाकृष्ण नगर कन्हान हे आपल्या दुचाकी वाहन क्र. एम एच ४० ए ई – ४५८६ डिस्कवर दुचाकी वाहनाने आठवडी बाजार गणेश मंदिर पांधन रोड वर भाजीपाला घेण्याकरिता आले होते. कैलाश यांनी आपली बजाज कंपनीची १०० सी सी दुचाकी वाहन क्र. एम एच ४० एई ४५८६ डिस्कवर लाल पट्टा काळ्या रंगाची दुचाकी वाहन किंमत अंदाजे २०,००० रूयये ही हनुमान नगर येथील तांबे यांचे घराच्या वाॅल कंपाउंड जवळ कुलुप लावुन ठेवली होती. कैलाश हे भाजीपाला घेऊन परत आपल्या दुचाकी वाहनाकडे येऊन पाहिले असता ठेवलेल्या ठिकाणी दुचाकी वाहन मिळुन न आल्याने त्यांनी आजु बाजुच्या परिसरात विचारफुस करून शोध घेतला असता मिळुन न आल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी कैलाश बडवाईक यांचे तक्रारीने पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. ७४८/२२ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्ग दर्शनात कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.