संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 11:- अति जलद म्हणून ओळख असलेली वंदे भारत ही रेल्वे गाडी आठवड्यातून सहा दिवस दररोज नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणार आहे.या रेल्वेगाडीचा आज 11 डिसेंबर ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते नागपूर रेल्वे स्थानकावर हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.ही रेल्वेगाडी नागपूर चे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी शहरातील रेल्वे स्थानकावर सकाळी 10 वाजून 16 मिनिटांनी पोहोचताच रेल्वे अधिकारी,कर्मचारी ,पोलीस पथकासह नागरिकांनी जंगी स्वागत केला तदनंतर हि रेल्वेगाडी पाच मिनिटानंतर 10 वाजून 21 मिनिटांनी सुटताच टाळ्यांच्या गजरात वंदे भारत च्या गजरात निरोप देण्यात आला.या रेल्वेगाडीच्या स्वागत प्रसंगी कामठी शहरातील प्रवासीगण मोठ्या प्रमाणात उत्साही दिसून येत होते.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत या रेल्वे गाडीला सध्यस्थीतीत कामठीला थांबा नसला तरी नागपूर ते बिलासपूर आठवड्यातून सहा दिवस प्रवास करता येणार आहे.यातील आठवड्यातील शनिवार दिवशी प्रवास करता येणार नाही हे इथं विशेष!ही नागपूर-बिलासपूर वंदे भारत रेल्वेगाडी ही नागपूर रेल्वेस्थानकाहुन सुटताच गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग ,रायपूर रेल्वे स्थानकावर थांबा घेत बिलासपूर ला पोहोचणार आहे.या रेल्वे गाडीला एकूण 16 डब्बे असून सर्व डब्ब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लागले होते.या ट्रेन मध्ये इंटरनेट आणि वायफायची सुद्धा सोय दिसून आली .दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेअर ची सुदधा सोय दिसून आली .या रेल्वेगाडीत प्रवाशांची सुरक्षा आणी सुविधांवर भर देण्यात आल्याचे दिसून आले.वंदे भारत ही रेल्वेगाडी दररोज धावणार असून शनिवारी या गाडीचा प्रवास करता येणार नाही .या रेल्वे गाडीचे दैनंदिन वेळापत्रक नुसार ही गाडी बिलासपूर रेल्वे स्थानक येथून सकाळी 6.45वाजता सुटेल ,रायपूर सकाळी 8.06वाजता,दुर्ग -8 45वाजता ,गोंदिया 10.30वाजता आणि नागपूर येथे 12.15वाजता पोहोचेल तर नागपूर वरून दुपारी 2.05वाजता बिलासपूरसाठी रवाना होईल, गोंदियाला 3-46वाजता पोहोचेल,दुर्ग सायंकाळी 5.30वाजता,रायपूर 6.06वाजता व बिलासपूरला सायंकाळी 7.35वाजता पोहोचेल.
वंदे भारत रेल्वे गाडीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर ला होणार असल्याने या रेल्वे गाडीच्या स्वागतार्थ नियोजन हेतू कामठी रेल्वे स्थानकावर 11 डिसेंबर च्या पूर्व दिनीपासून जय्यत तयारी करण्यात आली होती.11 डिसेंबर ला कामठी रेल्वे स्थानकावर ही वंदे भारत रेल्वे गाडी पोहोचताच जवळपास पाचशे च्या वर नागरिकांनी उपस्थिती दर्शवून वंदे भारत च्या गजरात टाळ्या वाजवून गाडीचे स्वागत करण्यात आले तसेच या रेल्वे गाडीच्या पायलट ला शुभेच्छा देण्यात आल्या.तर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होत एका उत्सवा सारखे दृश्य दिसून येत होते.दरम्यान आज या रेल्वे गाडीत कामठी रेल्वे स्थानकाहून जवळपास 10 प्रवासी प्रवासासाठी गाडीत आसनबध्द झाले.
याप्रसंगी कामठी रेल्वे स्टेशन चे स्टेशन प्रबंधक कार्तिक घोष,स्टेशन मास्टर पी एल मीना,रेल्वे सुरक्षा बल चौकी चे पोलीस निरीक्षक सतिशकुमार,पोलीस उपनिरीक्षक सागर ठाकरे,पोलीस कर्मचारी मिनू कुमार,ओ एस चव्हाण,इशांत दीक्षित,सतीश इंगळे,सुखदेव समरीत ,नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, पोलीस उपनिरीक्षक पवार,पोलीस कर्मचारी पप्पू यादव,मंगेश लांजेवार,निलेश यादव,आदी पोलीस कर्मचारी तसेच ज्येष्ठ समाजसेवक राधेश्याम हटवार,नितु दुबे, सतीश यादव,राकेश कनोजिया,अविनाश भांगे,सुनील चहांदे,आशिष मेश्राम,यासीन भाई,सलीम भाई,सुमित गेडाम, दुर्गेश शेंडे,शैलेश रंगारी, जोशेफ घरडे ,नितीन कांबळे तसेच रेल्वे सल्लागार समिती चे बबलू तिवारी,प्रेम शर्मा,शंकर सोनटक्के,मोहनलाल शर्मा आदींनी उपस्थिती दर्शवून वंदे भारत रेल्वे गाडीचे स्वागत केले.