नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.23) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धरमपेठ, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 65 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत देव नगर, खामला रोड येथील राजेश फरसाण या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत नेताजी फुल मार्केट, सिताबर्डी येथील दुर्गे हार मटेरियल्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत किराणा ओळी, इतवारी येथील रौनक फुड या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच लकडगंज झोन अंतर्गत स्मॉल फॅक्ट्री ऐरिया येथील मोरानीपूर ट्रान्स्पोर्ट या दुकानाविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे हनुमाननगर झोन अंतर्गत नरहरि नगर येथील संदीप फुलझले यांच्याविरुध्द घरातील कार्यक्रम बंद झाल्यानंतर टाकाऊ पदार्थ/जेवण मोकळया जागेवर पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com