रामटेक – महाराष्ट्र राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप पिंक करीता बोनस जाहिर करण्या बाबत , माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या मार्फत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हंटले आहे की राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती वर्ष प्रमाणे आधार किंमत शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या बोनस 800/- रू. प्रति क्विंटल प्रमाणे शासना कडुन खरीप हगांमा करीता जाहिर करावे..
निवेदन देता वेळी , माजी आमदार डी.मल्लिकार्जून रेड्डी, तालुका भाजपा अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, उमेश पटले , पप्पू यादव ,डॉ.विशाल कामदार,किरण वानखेडे , नरेन्द्र सहारे , किशोर रहांगडले,मोरेश्वर गणवीर, चरण यादव,तीमा मेंघरे,बालचंद बादुले, उमाकांत पोफळी, विनायक बांते ,अजय चौधरी, उपस्थित होते.