संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 23 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौकातील जितीन जैस्वाल यांच्या किराणा दुकानात अवैधरित्या प्रवेश करून दुकानातील गल्ल्यातील चिल्लर,रोख रक्कम तसेच दुकानाच्या वरच्या मजल्यावरील घरातील पूजा खोलीतील आलमारी मधून पूजेचे तीन चांदीचे सिक्के, दोन सोन्याच्या अंगठ्या, एक 3 ग्रामची सोन्याचे मनी असलेली पोथ, लोखंडी टामी असा एकूण 49 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 21 सप्टेंबर ला मध्यरात्री 1 ते 5 दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी जितीन विजय जैस्वाल वय 39 वर्षे रा जयस्तंभ चौक कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 457,380 अनव्ये गुन्हा नोंदवून तपासाला गती देत तांत्रिक मदतीचा उपयोग करून व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तर्कशक्तीच्या उपयोगातुन अवघ्या 24 तासाच्या आत गस्त दरम्यान आरोपीचा शोध लावून आरोपीस अटक करण्यात यश गाठले तर अटक आरोपीचे नाव सचिन उर्फ वांग्या राकेश कुंभरे वय 21 वर्षे रा बैल बाजार दुर्गा चौक कामठी असे आहे तर सदर अटक आरोपिकडून चोरीस गेलेला 49 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हे इथं विशेष!
ही यशस्वी कार्यवाही पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, एसीपी नयन आलूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे , गुन्हे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या मार्गदर्शनार्थ डी बी स्कॉड चे इंचार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन भातकुले, पो हवा संतोषसिंग ठाकूर, अखिलेशराय ठाकूर,निलेश यादव, अनुप अढाऊ,अतुल राठोड,रोशन डाखोरे,दीप्ती मोटघरे यांनी केली.