सागवान लाकूड चोरी करणारे तीन आरोपींना वनविभागाच्या ताब्यात.

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

टाटा एस चार चाकी वाहनसह एकूण 350000/- रुपयाच्या मुद्देमाल जप्त; पिंडकेपार मंगेझरी वनपरिक्षेत्रातील घटना.

गोंदिया :- जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र तिरोडा सहन क्षेत्र इंदोरा नियत क्षेत्र पिंडकेपार 2 मंगेझरी ते सुकडी रोडवर मौजा पिंडकेपार जवळ अवैधरीत्या सागवान झाडे तोड करून वाहतूक होत असलेल्या मिळालेल्या विश्वासनीय गुप्त माहितीच्या आधारे 22 सप्टेंबर च्या रात्री तिरोडा वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी वन कर्मचारी वनरक्षक ए.एम. नाईक ,ओ.एम. मेश्राम ,एम.एम.शेलगाव एम.जी.नागपुरे एम.ए.बिसेन हे ग्रस्त करीत होते तेव्हा 23 सप्टेंबर च्या पहाटे अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर दरम्यान मौजा पिंडकेपार मंगेझरी ते सुकडी रोडवर अवैधरित्या सागवन प्रजातीचे कटाई केलेले तयार माल एरून 6 नग 0.656 घन मीटर असे किंमत 150000 रू व टाटा एस (छोटा हत्ती) चार चाकी वाहन क्रमांक एम एच 36 -1472 गाडी की किंमत 200000/- रू असे एकूण 350000/- रुपयाच्या मुद्देमाल जप्त केले आहे.  वाहतूक करीत असताना गस्तीव वन कर्मचारी यांनी थांबून विचारपूस करण्याच्या प्रयत्न केला परंतु सदर वाहन चालक न जुमानता गाडीसह पळाला असता त्याच्या पाठलाग केला असता सदर वाहन त्या रोडवर मौजा पिंडकेपार गावालगत येथे अडकव करून थांबण्यात आला सदर वेळ रात्रीची असल्याने त्या वाहना वरील वन गुन्हेगामी असलेले चोर चालत्या गाडीवरून उडी मारून पसार झाले परंतु त्या दरम्यान सदर वाहना वरील वाहन चालक याला अडकाव करून वाहन माला सह ताब्यात घेण्यात आला त्याबाबत विचारपूस केले असता त्याच्याजवळ कोणत्या प्रकारची दस्तावेत दिसून आले नाही. त्यावरून सदर मालासोह भरलेले वाहने अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे समजून आले गस्तीवर असलेले वन अधिकारी व कर्मचारी यांनी यांनी सदर वाहन चालक विसापूर केली असता बाबू बागडे राहणार सुकडी यांनी मला तीन हजार रुपये मजुरी भाड्याने सदर लाकडे वाहनांमध्ये भरून वाहतूक करण्यास सांगितले व सदर लाकडे हे पारधी ठाणेगाव यांच्या राहते घरी वाहतूक करायचे आहे .व त्यासाठी पिंटू उईके ,गणेश नेवारे, मुकेश सहारे, मुकेश नेवारे ,राहणार आलेझरी तसेच मोहन मोटारी व राजू आत्राम राहणार कोटबरा हे सोबत राहतील असे सांगितल्यावरून हे माझ्या गाडीमध्ये बसून होते ते वाहन थांबण्याच्या प्रयत्न केला असता गाडीवरून सर्व लोक चालत्या गाडीवरून उडी घेऊन पसार झाले. त्यापैकी बाबू बागडे व नरेश यशवंत चौधरी ,राजू आत्राम हे तीन आरोपींना घरझडती करून चौकशी करत ताब्यात घेण्यात आले व त्यानंतर तुटाचा शोध घेतला असता सदर थुट हे वनजीव विभाग नागझिरा परिक्षेत्रातील चौकशी करतात ताब्यात घेण्यात आले तिन्ही आरोपी बाबू उर्फ गंगाधर बागडे, नरेश यशवंत चौधरी, राजू आत्राम हे व्ही एम भोसले वनपरिक्षेत्र अधिकारी नागझिरापरिक्षेत्र यांचे स्वाधीन पुढील कारवाई देण्यात आले.

सदर कारवाई ही कुलराज सिंग उपवनरक्षक गोंदिया वन विभाग , राजेंद्र सदगीर सहायक वनरक्षक गोंदिया, यांच्या मार्गदर्शनात आर .जी. मून वनपरीक्षेत्र अधिकारी तिरोडा यांच्यासह सदर कारवाई वनविभागाच्या पथकने केलेली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com