संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 21:- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वडोदा गावात कुही वडोदा मार्गाने गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथक पोलिसांना मिळताच पोलिसांनी गस्त घालून आज दुपारी 2 दरम्यान वडोदा गावातील पुलाजवळ संशयित तीन वाहनांना अडवणूक करून तिन्ही वाहनांची तपासणी केली असता या वाहनांच्या मागच्या डलल्यात 47 गोवंश जनावरे निर्दयतेने वागणूक करीत कोंबून बांधून ठेवले होते.या तिन्ही वाहनांना मौदा पोलीस स्टेशन ला लावून जप्त गोवंश जनावरे नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलविले तर या कार्यवाहितुन गुन्हे शाखा पथक पोलिसांनी जप्त 47 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची कारवाही केली.या कारवाहितुन तिन्ही जप्त वाहने किमती 23 लक्ष रुपये व जप्त 47 गोवंश जनावरे किमती 4 लक्ष 70 हजार रुपये असा एकूण 27 लक्ष 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाहितुन जप्त वाहनात एम एच 40 ए के 5679,एम एच 40 सी डी 4906,एम एच 40 बी एल 3762,.चा समावेश असून
आरोपी आकाश गडकरी वय 20 वर्षे, रा केसलवाडा वाघ, जिल्हा भंडारा,विशाल उताने वय 20 वर्षे रा लावेश्वर भंडारा, अब्दुल वसी अब्दुल अलिम वय 36 वर्षे रा भाजीमंडी कामठी विरुद्ध मौदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.