नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई :- सामाजिक क्षेत्रात ज्या महिला किंवा व्यक्तीनी मौलिक कार्य केले आहे, अशा महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन “नारी शक्ती पुरस्कार” देण्यात येतो. या पुरस्कारासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

हा पुरस्कार वैयक्तिक स्वरूपाचा असून अर्जदारास या पूर्वी हा पुरस्कार मिळालेला नसावा (या पूर्वी मंत्रालयाने प्रदान केलेला स्त्री शक्ती पुरस्कारांसह )अर्ज करणा-या व्यक्तीचे वय दि. 1 जुलै 2022 रोजी 25 वर्ष पूर्ण असावे. (दिव्यांग व्यक्तीचे वय दि. 8 मार्च 2022 रोजी 25 वर्ष पूर्ण असावे)

नारी शक्ती पुरस्कार उत्कृष्ट कार्यासाठी शक्यतो अपवादात्मक परिस्थितीत, महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण किंवा या विषयाशी संबंधीत किंवा आनुषंगिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रदान केला जाऊ शकतो. ज्यांनी महिलांना निर्णय घेण्याच्या भूमिकेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले, पारंपारीक आणि अपारंपरिक क्षेत्रात महिलांच्या कौशल्य विकासाला प्रोत्साहन दिले, ग्रामीण महिलांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या, महिलांना गैर – परंपरिक क्षेत्र जसे की विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती, सुरक्षितता, आरोग्य आणि निरोगीपणा, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य, महिलांचा आदर आणि प्रतिष्ठा इत्यादींच्या दिशेने ठोस आणि लक्षणीयरीत्या प्रोत्साहन दिले अशा व्यक्तींना नारी शक्ती पुरस्कार दिला जाऊ शकतो. एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला देखिल हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. ज्याने बाल लिंग गुणोत्तर (CSR) मध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केल्यावर मृत्यू झाल्याची प्रकरणे वगळता सामान्यतः पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जाणार नाही. वरील प्रमाणे कार्य केलेल्या व्यक्ती, राज्य व केंद्रशासित प्रदेश यांनी नारी शक्ती पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या www.narishaktipuraskar.wcd.gov.in/ www.wcd.nic.in या संकेतस्थळावर दि ३१. ऑक्टोबर २०२२ पर्यत प्रस्ताव सादर करावेत. सदरचे प्रस्ताव हे फक्त ऑनलाईनद्वारेच स्वीकारले जातील. असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी - सुधीर मुनगंटीवार

Thu Sep 15 , 2022
आयस्ट्रीम कॉन्ग्रेस 22 परिषदेचे उद्घाटन मुंबई :-  स्ट्रीमिंग प्रसारण प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी. तसेच या माध्यमाचा उपयोग मनुष्य जीवनात चांगले परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. मुंबईत आयस्ट्रीम कॉन्ग्रेस 22 या परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हे माध्यम दुधारी आहे. त्याचा सकारात्मक उपयोग करायचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!