नागपूर :- आज दिनांक 11 सप्टेंबर 2022 ला नक्षत्र सेलेब्रेशन हाॅल. प्रतापनगर नागपूर. येथे उल्लेखित ग्रुप द्वारा कंपोस्ट कार्यशाळा व पर्यावरण व गार्डन संबंधित प्रदर्शनीचे उद्घाटन राम जोशी (अति. आयुक्त, म.न.पा.नागपूर) ह्यांचा हस्ते दीपप्रज्वलनाने झाले, त्या सोबत प्रमुख अतिथी म्हणून सी.ए. आरती कुळकर्णी व प्रशांत चौधरी, अध्यक्ष, एस.ई.रेल्वे , काॅ. हाॅ सोसा. व आमच्या जेष्ट सभासद अंजली पडळकर पण उपस्थित होत्या.
सर्व प्रथम मान्यवरांचा परिचय झाला. त्यानंतर राम जोशी आपल्या उदबोधनप्रद भाषणातून ग्रुपच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली, आज घरोघरी कंपोस्ट व पर्यावरण पूरक वातावरणासाठी इकोबिक्स ची संकल्पना सर्वान पर्यंत पोहचणे किती गरजेच आहे व त्यासाठी गच्चीवरील मातीविरहित बाग नागपूर समूह व हिरवाई विदर्भाची हा फेसबुक समूह हा ग्रुप कार्यशाळा व प्रदर्शनाच्या माध्यमातून हे कार्य अतिशय उत्तम करत आहे, तसेच नागपूर महानगरपालिका पण ह्या कार्यात सक्रीय सहभाग घेवून कार्य करत आहे, त्यामुळे धंटा गाडीत येण्यार्या कचर्यात ओल्याकचर्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे बरेच लोक त्याबद्दल जागृत झाले आहे, आणी अनेक जण घरी कंपोस्ट खत पण बनवतात, तरीही आलेल्या ओल्याकचर्याचे महानगरपालिका कंपोस्ट प्रकल्प राबवीतत आहे, व कंपोस्टची जनजाग्रती व्हावी म्हणून कंपोस्ट प्रतियोगिता पण म.न पा. नागपूर तर्फे नुकतीच आयोजित करण्यात आली आणी त्याला पण नागपूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला, ह्याचा पण जोशी नी आवर्जून उल्लेख केला. मनपा तर स्मशान घाटावर होणार्या प्रदुषण रोखण्यासाठी इकोबिट हा प्रकल्प पण राबवत आहे, ह्याची माहिती पण आम्हाला त्यांचा कडून मिळाली. धन्यवाद त्यानंतर सी.ए. आरती कुळकर्णी पण ग्रुप च्या कार्याची प्रंशसा करत थोडक्यात छान मार्गदर्शन केले.