अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सध्या रोवणी कार्य सुरू असुन पाऊसाने दंडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांची रोवणी कार्य थांबले आहे.त्यांना पाण्याची गरज असल्याने धापेवाडा उपसा जलसिंचन प्रकल्प टप्पा क्रमांक १ला पाणी सोडण्यात यावे याकरिता किरण पारधी जिल्हा परिषद सदस्य, कवलेवाडा क्षेत्र व जितेन्द्र चौधरी पंचायत समिती सदस्य, यांनी कार्यकारी अभियंता धापेवाडा उपसा जलसिंचन प्रकल्प कार्यालय निवेदन दिले आहे.
यामध्ये उपसा जलसिंचन योजना प्रक्लप योजनेची पाणी कवलेवाडा,मरारटोला, पुजारी टोला, बेलाटी बुज.चिरेखनी, मांडवी बेलाटी खुर्द, मुंडीपार, सालेबडी, घाटकुरोडा ,या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात उपसा जलसिंचन योजना पाणी सोडण्यात यावे.शेतकयाचे थांबलेले रोवणीचे काम सुरू होणार याकरीता संबंधित उपसा जलसिंचन प्रकल्प अधिकारी यांनी जलसिंचन पाणी सोडावे अशी मागणी निवेदनाद्वारे कीरण पारधी जिल्हा परिषद सदस्य,व जितेन्द्र चौधरी पंचायत समिती सदस्य यांनी केली आहे.