मागील तीन वर्षपासून तळीरामावर ड्रक अँड ड्राइव्हची कार्यवाही नाही

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

स्लग-मागिल अडीच वर्षांपासून ब्रेथ ऍनालायझर मशीन धूळखात

कामठी ता प्र 1 ऑगस्ट :- मद्यप्राशन करून वाहन चालविताना स्वतःबरोबर रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांचेही जीव धोक्यात घालणाऱ्या तळीरामाना कोरोनाच्या नावाखाली मागील अडीच वर्षांपासून मोकाट रान मिळाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करायची नाही त्यांना ब्रेथ एनालायझर लावायचा नाही असे आदेश शासनाने दिल्यामुळे मागील अडीच वर्षांपासून या तळीरामाना वाहतूक पोलिसांकडून ना दंड केला जात आहे ,ना कुठली कार्यवाही जात आहे तर पोलिसांकडे असलेले हे ब्रेथ ऍनालायझर मशिन मागील तीन वर्षांपासून धूळखात पडले आहेत, यातून तळीरामाना निर्माण झालेला वाहतूक पोलिसांचा अभयपणा मुळे तळीराम आपल्याच धुंदीत वावरत आहेत.दररोज तळीराम बिअर बार वा देशी दारू च्या दुकान मधून तसेच कुठल्यातरी ढाब्यावरून दारू पिऊन निघतात परंतु वाहतूक पोलिसांना या तळीरामावर कार्यवाहीच करता आली नाही.
मागील अडीच वर्षात कुणीच मद्यप्राशन करून वाहन चालविले नाही असे म्हटले तर त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही मंग मद्यप्राशन करून वाहन चालविण्यात आले दररोज बिअर बार व दारू दुकानातुन मद्यपी मद्यप्राशन करून दिवसा व रात्री वाहतूक करतात मग पोलीस यावर कार्यवाही का करीत नाही असा प्रश्न सहजच पुढे येतो परंतु कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मद्यपी वाहन चालकांवर कार्यवाही होत नाही ,कार्यवाही करण्यासाठी ब्रेथ एनालायझर चा वापर होत नाही याचे जणू एक आश्चर्य च आहे.तेव्हा कोरोनाचा संसर्ग हा आटोक्यात आला आहे तेव्हा पोलिसांनी या तळीरामावर ड्रक अँड ड्राइव्ह ची कार्यवाही सुरू करण्यात यावी अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पोलिसांच्या अभयपणामुळे कामठीत चोरीसह इतर गुन्ह्याचे प्रमाण वाढीवर

Mon Aug 1 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -कामठी शहर क्राईम हब च्या मार्गावर कामठी ता प्र 1 ऑगस्ट :- माजी पालकमंत्री व विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृहक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामठी शहरात पोलिसांचा अभयपणामुळे मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचा ग्राफ वाढीवर असून चोरीचे प्रमाण वाढीवर आहेत तर कामठी हे शहर क्राईम हबच्या मार्गावर आहे तर येथील सर्वसामान्य नागरिक स्वतःला असुरक्षित मानीत असल्याने गुन्हेगारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!