अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- तक्रारदार लहिटोला येथील असुन प्लांट फेरफार करण्यासाठी तलाठी कार्यालय मुर्री तालुका गोंदिया येथे गेला असता फेरफार करून देण्यासाठी तलाठी याने 8 हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोड करुण 7 हजार रूपयांची लाच स्वीकारताना मुर्री तलाठी याला आज रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदार यांचे मालक ज्यांचे तर्फे तक्रारदार अधिकारपत्रान्वये काम पाहत होते. त्यांच्या नावे असलेल्या प्लांट फेरफार करण्यासाठी तलाठी कार्यालय मुर्री सांजा क्रमांक 42 तालुका गोंदिया येथे गेले असता तलाठी बालाराम बनोटे यांने प्लांट फेरफार करण्यासाठी 8 हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारदार याला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
शेवटी आज 29 जुलैला तक्रारदाराने तलाठी बालाराम बनोटे याला तळजोड करित 7 हजार रूपयांची लाच दिली. रक्कम स्वीकारताना सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. आरोपी तलाठी विरूद्ध शहर पोलीस स्टेशन गोंदिया येथे गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे राकेश ओला, पोलिस अधीक्षक , मधुकर गिते अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम अहीरकर उप अधीक्षक सह कर्मचाऱ्यांनी पार पाडली.