मानधनाअभावी संगणक परीचालकांची उपासमार –मागील चार महिन्यापासून संगणक परीचालकांचे मानधन रखडले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 21 :- कामठी तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परीचालका कडून ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे एकाच छताखाली 29 प्रकारचे दाखले ,परवाने तसेच जमा-खर्चाची नोंद, ग्रामसभा,मासिक सभेचे ऑनलाईन कामकाज, जनगणना, घरकुल , सर्व्हे,प्रधानमंत्री पीक विमा योजना आदी कामे करून घेतली जातात .शासन – प्रशासन व जनतेमधील दुवा म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र मागील चार महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने या संगणक परीचालकावर मानधना अभावी उपासमारीची वेळ आली आहे तेव्हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे कसे?असा प्रश्न पडला आहे.
प्रत्यक्षात या संगणक परीचालकाना 6 हजार 900 रुपये मानधन दिले जाते त्यातही चार चार महिने मानधन मिळत नसल्याने संगणक परीचालकांची एक प्रकारे गोच्ची होत आहे.ग्रामपंचायती 15 व्या वित्त आयोगातील 10 टक्के रक्कम असे दरमहा 12 हजार 700 रुपये प्रमाणे दरवर्षी एक लक्ष 52 हजार 400 रुपये अनामत निधी रक्कम ‘राष्ट्रीय ग्राम स्वराज्य ‘अभियानामार्फत सीएससी , एसपीव्ही कंपनीकडे दिले जाते मात्र संगणक परीचालकाना फक्त सात हजार रुपये मानधन दिले जाते त्यातही चार चार महिने मानधन मिळत नसल्याची शोकांतिका आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वराडा बस स्टाप येथे चारपदरी महामार्गावर अंडर ब्रिज बनवुन द्या. - सरपंचा विद्या चिखले

Thu Jul 21 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी सर्व्हीसरोडवर होणा-या अपघात थांबविण्या चे उपाय योजना करण्यात याव्या. कन्हान : – ग्राम पंचायत वराडा व्दारे नागरिकांच्या तक्रारीवरून राष्ट्रीय चारपदरी महामार्गा च्या वराडा बस स्टाप वर महामार्ग जिव मुठीत घेऊन पायदळ पार करावा लागत असुन अपघात वाढत आहे. तसेच बस स्टाप च्या जवळपास शाळा व पेट्रोल पंप असल्याने सर्व्हीस रोडच्या एकाच बाजुने वाहतुकीच्या वर्दळीने वाहनाचे अपघात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!