अमरदिप बडगे
– टिपर सह चालकास पोलिसानी केली अटक
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा बस स्थानक परिसरात काल सायंकाळी 7:30वाजे दरम्यान टिप्पर क्रमांक MH 40 AK 6323 ने भरधाव वेगाने गाडी चालवत मोटारसायकल क्रमांक MH 36 P 6585 धडक दिल्याने 2 मुलांचा मृत्यू तर वडील जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.
अपघात हा मुंडी कोटा बस स्थानक परिसरात झाला असुन एक मुलगा पियुष सुरेश कांबळी वय 12 वर्षे राहणार घाटकुरोडा यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मुलगा धुरुप सुरेश कांबळी वय 15 वर्ष याला भंडारावरून नागपुरला उपचारासाठी नेत असतानाच खरबी गावाजवळ वाटेतच रात्रीला मृत्यू झाला आहे.या दोघांचे शव तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करिता नेण्यात असून वडील सुरेश कांबळी वय 40 वर्ष यांचा भंडारा येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे.सदर टिपर चालक प्रीतम ताराचंद तुमसरे याला टिप्परसह अटक तिरोडा पोलिसांनी केली आहे.रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत अवैध मुरुम परिसरात सुरू असून भरधाव वेगाने गाडी चालक रस्त्याने चालवत असतात.काल मृत झालेले दोन्ही भावंडं गेल्याने कांबळी परिवार सह घाटकुरोडा गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास तिरोडा पोलिस करीत आहेत.