आचारसंहिता भंगाच्या ९,२६५ तक्रारी निकाली,६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ९ हजार २९३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ९ हजार २६५ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिवंगत माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन

Tue Nov 19 , 2024
मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना त्यांच्या १०७ व्या जयंती दिनानिमित्त राजभवन येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांनी राजभवन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय एकात्मता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची तसेच सर्व धार्मिक, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!