९ ठिकाणच्या कारवाईमध्ये ९० हजार दंड वसूल

– उपद्रव शोध पथकाची मोहिम : स्वच्छ भारत अभियान

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.६) ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून एकूण ९० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या दहाही झोनमधील जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.

मनपाच्या लक्ष्मीनगर झोन मधील धंतोलीतील न्यूरॉन हॉस्पीटलद्वारे सामान्य कच-यासोबत जैविक कचरा रस्त्यालगत टाकल्याप्रकरणी मनपाद्वारे कारवाई करण्यात आली व २० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. धरमपेठ झोनमध्ये एमआयडीसी हिंगणा रोडवरील सॉलिटर बँकेट अँड हॉटेलद्वारे उघड्यावर अन्न पदार्थ टाकण्यात आल्याचे प्रकरणी ३० हजार रुपये, काचीमेट अमरावती रोडवरील द न्यू टाउन हॉटेलने विद्युत खांबावर विनापरवानगी होर्डिंग लावल्याप्रकरणी ५ हजार रुपये आणि रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्याबद्दल शंकर नगर येथील निशान हाईट्सवर ५ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.

हनुमान नगर झोन पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक बाळगल्या प्रकरणी न्यू सुभेदार लेआउट येथील ए.जे. इंटरप्राइजेसवर कारवाई करीत १ किलो प्लास्टिक जप्त करून ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. धंतोली झोन पथकाने उंटखाना बैद्यनाथ चौक येथील सचिन कुंभारे यांच्यावर रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्याप्रकरणी १० हजार रुपये दंड ठोठावला. गांधीबाग झोन मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महाल येथील भारत इंडियन अगरबत्ती आणि सतराज अगरबत्ती यांचेवर प्रतिबंधित प्लास्टिक बाळगल्या प्रकरणी प्रत्येकी १ किलो प्लास्टिक जप्तीसह प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.

सतरंजीपुरा झोन पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक बाळगण्याच्या प्रकरणात कांजी हाउस चौकातील पान शॉपवर कारवाई करून १ किलो प्लास्टिक जप्त आणि ५ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. शहरातील उपरोक्त ठिकाणी करण्यात आलेल्या ९ ठिकाणच्या कारवाईमधून ९० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी यांच्या हस्ते विशेष कपडे दान केंद्राचे उद्घाटन

Tue Nov 7 , 2023
– स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी मोहिम अंतर्गत अभिनव उपक्रम : प्लास्टिक मुक्त करण्याचा दिशेत पाऊल.  नागपूर :- सिंगल युज्ड प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे टाळायला हवे. त्यावर कापडी पिशवी एक उत्तम पर्याय होऊ शकते. याकरिता नागपूर महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी मोहिम अंतर्गत इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेशी मिळून कापडी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com