नागपूर :- दिनांक २२/०९/२०२३ रोजी दुपारी ०४.०० वा. सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस भवन नागपूर येथे नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोहार (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी होणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या जमात-ए-ईद या सणानिमीत्ताने सर्व मुस्लीम कमिटीचे सदस्य मौलवी यांची जुलुस / मिरवणुक संबंधाने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपूर ग्रामीण हद्दीतून जमात-ए-ईद या सणानिमीत्याने मुस्लीम बांधवांच्या एकुण ४ जुलुस / मिरवणुका निघणार असुन त्याचे आयोजक प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. यापुर्वी जमात-ए-ईद संबंधाने नागपूर ग्रामीण जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच २२ पोलीस स्टेशन येथील ठाणेदार यांना बैठकी घेतल्या होत्या. या बैठकीमध्ये जमात-ए-ईद संबंधाने निघणारी मिरवणूक / जुलुस संबंधाने मुस्लीम बांधवांचे म्हणणे ऐकुन घेतले त्यामध्ये त्यांनी सांगितले की, आम्ही जुलुसची मिरवणुक ७.०० वा. ते ०२.३० पर्यंत करू. २८ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याची परवानगी दयावी अशी विनंती करण्यात आली व ती मान्य सुद्धा केली.
यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, निष्पक्ष पोलीसींग होणार कोणत्याही धर्माला झुकते माप देणार नाही तसेच काही लोक हे समाजकंटकाचे काम करतात त्यामध्ये दोन्ही समाजाचा असा कोणीही समाजकंटक असू शकतो. या सण उत्सवात सामाजिक शांतता भंग करून वाद निर्माण करण्याचे काम ते करू शकतात. असे समाजकंटक यांच्याकडे विशेष लक्ष देवुन आपणच आपल्या समाजातील लोकांवर नजर ठेवुन त्यातील काही लोक अडथळा निर्माण करणारे किवा झगडा भांडण करणाऱ्या लोकांना शांत करायचे हे काम आपण करावे. यामुळे पुढील अनर्थ टाळता येईल. पोलीस आणि जनता खांदयाला खांदा लावून चांगले काम करू शकतात. ते आपण या उत्सवामध्ये दाखवून देवू. हिंदु समाजाचे लोक देखील मुस्लीम बांधवांच्या जुलूस/मिरवणूकीचे मोठ्या उत्साहात स्वागत करतात व मुस्लीम बांधव हे देखील हिंदुच्या गणेशोत्सव कमिटीचे सदस्य असतात. काही ठिकाणी गणपती मिरवणुक व जुलुसाची मिरवणूक एकाच मार्गावर असल्याने दोन्ही बांधव समाजांनी आपसात चर्चा करून मार्ग देखील बदलला आहे. असे सांगितले तसेच मिरवणुकीचा मार्ग बदलावा लागला तर त्यामध्ये सामंजस्य करून घ्यावा लागेल. त्याचबरोबर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व २२ पोलीस स्टेशन येथील ठाणेदार हे मिरवणुक / जुलुस मार्गाची पाहणी करतील त्यानुसार त्यामध्ये बदल करण्यात येतील. ईद-ए-मिलाद या सणाबाबत मिरवणुक उत्सव दुपारी ०१.०० वा. पर्यंत संपणार असून त्यांनंतर गणपती मिरवणुक ०१.०० वा. नंतर सुरु होतील याबाबत मागदर्शक सूचना देण्यात आल्या.