शिंदे-फडणवीस सरकारकडून ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही ;कुठे आहेत सदावर्ते – पडळकर – महेश तपासे

मुंबई :- जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? आता कुठे आहेत हे दोघे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

राज्यातील ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अद्याप झालेला नाही. महाविकास आघाडी सरकार असताना या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहिन्याला ३६० कोटी रुपयांची तरतूद राज्यसरकारच्या कोषातून केली जात होती. आता सहा महिन्यापासून शिंदे – फडणवीस सरकार आले आहे तरीदेखील कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नाही हे दुर्दैव आहे असेही महेश तपासे म्हणाले.

भाजपप्रणीत सरकार आले तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे तेच पगाराचे ओझे आहे त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे मसिहा बनण्याचा प्रयत्न करणारे सदावर्ते आणि पडळकर काय भूमिका घेणार हे आता त्यांनी जनतेसमोर जाहीर करावे असे आवाहन महेश तपासे यांनी केले आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? - दिलीप वळसे पाटील

Fri Jan 13 , 2023
मुंबई  :- पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही तर दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली त्यामुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com