सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 81 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. 21) रोजी उपद्रव शोध पथकाने 81 प्रकरणांची नोंद करून 50 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 24 प्रकरणांची नोंद करून 9 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 4 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 11 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करुन 1 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 03 प्रकरणाची नोंद करुन 11 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 21 प्रकरणांची नोंद करून 4 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करुन 1 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 03 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवारी (ता. 21) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत जनता ट्रडर्स शिवाजी चौक महाल, श्री साई ट्रडर्स शिवाजी चौक महाल व सतरंजीपुरा झोन अंतर्गत धवाले प्लास्टिक्स जागनाथ बुधवारी ईतवारी या तीन प्रतिष्ठानांकडुन एकुण 15 हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत गुरुदेव हाँडा शोरुम छत्रपती चौक रोड व नेहरुनगर झोन अंतर्गत राजेंद्र पळमगिरवार दत्तात्रय नगर नंदनवन या दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत करण बिल्डर्स जुना सुभेदार लेआऊट यांच्याकडून बांधकामाचा कचरा रस्त्यालगत पसरविलेल्याबाबात 10 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत हाऊस आफ चीफ रेस्टोरंट टांगा स्टँड चौक हॉटेलच कचरा रस्त्यालगत पसरविलेल्याबाबत 1 प्रकरणाची नोंद करुन 5 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 7 प्रकरणाची नोंद करून 40 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चिंचभवन शाखा फीडरवर इंटरकनेक्शनच्या कामासाठी शटडाऊन...

Wed May 22 , 2024
नागपूर :- NMC-OCW ने 24 में 2024 रोजी सकाळी 10:00 ते 25 में 2024 रोजी सकाळी 10:00 वाजेपर्यंत चिंचभवन शाखा फीडरचे नियोजित 24 तास शटडाऊन जाहीर केले. मनीष नगर रेल्वे क्रॉसिंगजवळील चिंचभवन शाखा फीडर स्थलांतरित करण्यासाठी दोन 500 x 500 मिमी इंटरकनेक्शन कामासाठी हे शटडाऊन आवश्यक आहे. या देखभालीच्या कालावधीत, खालील भागांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होईलः चिंचभवन विद्रद्यमान CA आणि चिंचभवन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com