मोफत श्वानदंश रोग प्रतीबंधक लसीकरणाला पशुपालकांचा उत्स्फुर्त प्रतीसाद

नागपूर :- जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नागपूर व्दारा पशुसंवर्धक विभागाच्या 131 व्या स्पापना दिनानिमित्त आयोजित मोफत श्वानदंश रोग प्रतीबंधक लसीकरण या नाविण्यपूर्ण कार्यक्रमाला पशुपालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय परिसरामध्ये आज सकाळी आयोजित श्वानवदंश रोग प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन फुके, यांचे हस्ते डॉ. युवराज केने, सहाय्यक आयुक्त पशुसर्वधन ,जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नागपूर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.

एकूण 91 श्वानांना व मांजरींना मोफत श्वानदंश रोग प्रतिबंधक लस देण्यात आली.या लक्षवेधी आगळ्यावेगळया नाविन्यपूर्ण कार्यक्रमास पशुप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता विविध औषध कंपन्यांनी सहयोग दिला. या संधीचा मोठया प्रमाणात पशु प्रेमीनी कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. युवराज केने, पशुधन विकास अधिकारी डॉ. सिरास ,डॉ.शशिकांत मांडेकर, डॉ.पल्लवी गावंडे, डॉ.प्रदिप गावंडे, डॉ. कविता साखरे, डॉ.विद्याधर धनबहादुर, व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व पंचायत समीती नागपूर मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

या आगळयावेगळया व नाविण्यापुर्ण कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या प्रसंगी जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नागपूर मार्फत श्वानदंश रोग प्रकिबंधक लसीकरण कार्यक्रम या पुढे निरंतर संस्थेच्या कामकाजाच्या वेळेत मोफत सुरु राहील असे डॉ. युवराज केने सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी सांगीतले. व या संधीचा सर्व श्वान प्रेमींनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

NewsToday24x7

Next Post

गोवंशाना जिवनदान 

Sun May 21 , 2023
मौदा :- अंतर्गत १० किमी अंतरावरील वडोदा शेत शिवार येथे दिनांक १९/०५/२०२३ रोजी पोलीस स्टेशन मौदा चे पथकांस एका आंब्याच्या बगीच्यामध्ये एकुण २५ गोवंश जातीचे जनावरे त्यापैकी १४ मोठे बैल, ०६ गाई व पाच लहान गोरे ०५ सदर जनावरांना कोणत्याही चारापाण्याची व्यवस्था न करता अत्यंत क्रूरतेने त्यांचे पाय बांधुन ठेवण्यात आलेले दिसुन आले, सदर जनावराची वैद्यकीय तपासणी करुन जनावरांना पालन […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com